दैनिक स्थैर्य | दि. २५ मे २०२३ | फलटण |
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यावर्षी राज्याचा बारावीचा निकाल ९१.२५ टक्के लागला आहे. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक लागला तर सर्वात कमी निकाल मुंबई विभागाचा लागला आहे. याशिवाय यंदाच्या निकालातही मुलींनी बाजी मारल्याचं पाहायला मिळत आहे. कोल्हापूर विभागाचा निकाल ९३.२८ टक्के लागला असून फलटण तालुक्याचा निकाल ९०.२३ टक्के लागला आहे. तालुक्यातून ३३०७ विद्यार्थी बारावी परीक्षेस बसले होते. त्यापैकी २९८४ विद्यार्थी पास झाले आहेत. त्यामध्ये डिस्टिंक्शनमध्ये १०८ विद्यार्थी, फर्स्ट क्लासमध्ये ६१८ विद्यार्थी, सेकंड क्लासमध्ये १५५४ तर सर्वसाधारण श्रेणीत ७०४ विद्यार्थी पास झाले आहेत.
फलटण तालुक्यातून अॅम्बिशन इंग्लिश मिडियम स्कूल आणि ज्युनि. कॉलेज, प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल आणि ज्युनि. कॉलेज कोळकी, श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मिडियम स्कूल आणि ज्युनि. कॉलेज जाधववाडी, हाजी अब्दुल रज्जाक उर्दू हायस्कूल आणि ज्युनि. कॉलेज फलटण या महाविद्यालयांचा निकाल १०० टक्के लागला आहे.
फलटण तालुक्याचा कॉलेजनिहाय निकाल असा :
- मुधोजी कॉलेज फलटणचा एकूण निकाल ८९.१३ टक्के : सायन्स विभाग – ९८.८५, कला – ८२.९१, वाणिज्य – ९२.३९.
- सरदार वल्लभभाई ज्युनिअर कॉलेज साखरवाडी (८४.८४ टक्के) : कला – ६६.६६, वाणिज्य – ९५.२३
- यशवंतराव चव्हाण ज्युनि. कॉलेज फलटण (८३.१४ टक्के) : विज्ञान -९३.५१, कला – ६७.९६, वाणिज्य – ९२.००
- मुधोजी हायस्कूल आणि उच्च माध्यमिक विद्यालय, फलटण (८८.१७ टक्के) : विज्ञान -९९.३४, कला – ९२.००, वाणिज्य – ९७.८४
- मालोजीराजे शेती विद्यालय आणि ज्युनि. कॉलेज, फलटण (९८.७१ टक्के) : विज्ञान -९८.७१ टक्के
- छत्रपती शिवाजी ज्युनि. कॉलेज, गिरवी (८२.७५ टक्के) : कला -८२.७५ टक्के
- सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूल आणि ज्युनि. कॉलेज, फलटण (८६.८४ टक्के) : कला -८६.८४ टक्के
- ज्योतिर्लिंग हायस्कूल आणि ज्युनि. कॉलेज, पवारवाडी आसू (५४.३४ टक्के) : कला -५४.३४ टक्के
- फलटण हायस्कूल आणि ज्युनि. कॉलेज, फलटण (५८.०६ टक्के) : कला – ५८.०६ टक्के
- जय भवानी हायस्कूल आणि ज्युनि. कॉलेज, तिरकवाडी (८७.५० टक्के) : कला – ८७.५० टक्के
- सरस्वती माध्यमिक विद्यालय आणि ज्युनि. कॉलेज, बिबी (९२.०० टक्के) : कला – ९२.०० टक्के
हनुमान माध्यमिक विद्यालय आणि ज्युनि. कॉलेज, गोखळी (६३.३३ टक्के) : कला – ६३.३३ टक्के- श्रीमती प्रेमलाताई चव्हाण ज्युनि. कॉलेज, फलटण (७५.०० टक्के) : कला – ७५.०० टक्के
- महात्मा फुले हायस्कूल आणि ज्युनि. कॉलेज, सासवड (८१.८१ टक्के) : कला – ८१.८१ टक्के
- एस.एस. बाबाराजे खर्डेकर ज्युनि. कॉलेज, हणमंतवाडी, सातारा (५०.०० टक्के) : कला – ५०.०० टक्के
- हनुमंतराव पवार हायस्कूल आणि ज्युनि. कॉलेज, फलटण (३३.३३ टक्के) : कला – ३३.३३ टक्के
- मॉडर्न हायस्कूल आणि ज्युनि. कॉलेज, बरड (७१.८७ टक्के) : कला – ७१.८७ टक्के
- श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मिडियम स्कूल आणि ज्युनि. कॉलेज, जाधववाडी (१००.०० टक्के) : सायन्स – १००.०० टक्के
- वेणूताई चव्हाण हायस्कूल आणि ज्युनि. कॉलेज, तरडगाव (८९.४७ टक्के) : कला – १००.०० टक्के, वाणिज्य – ७१.४२
- श्री जानाई हायस्कूल आणि ज्युनि. कॉलेज, राजाळे (९२.३० टक्के) : कला – ९०.०० टक्के, वाणिज्य – ९३.३३
- अॅम्बिशन इंग्लिश मिडियम स्कूल आणि ज्युनि. कॉलेज (१००.०० टक्के) : सायन्स – १००.०० टक्के, वाणिज्य – १००.००
- प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल आणि ज्युनि. कॉलेज, कोळकी (१००.०० टक्के) : वाणिज्य – १००.००
- हाजी अब्दुल रज्जाक उर्दू हायस्कूल आणि ज्युनि. कॉलेज, फलटण (१००.०० टक्के) : कला – १००.०० टक्के
- सरदार वल्लभभाई ज्युनि. कॉलेज, साखरवाडी (८२.३५ टक्के) : व्होकेशनल – ८२.३५ टक्के.
- वाय.सी. कॉलेज, फलटण (९६.२२ टक्के) : व्होकेशनल – ९६.२२ टक्के.
- मुधोजी हायस्कूल, फलटण (८९.३९ टक्के) : व्होकेशनल – ८९.३९ टक्के.
- मालोजीराजे शेती ज्युनि. कॉलेज, फलटण (९४.५९ टक्के) : व्होकेशनल – ९४.५९ टक्के.
- वेणूताई चव्हाण गर्ल्स ज्युनिअर कॉलेज (१००.०० टक्के) : व्होकेशनल – १००.०० टक्के.