भारतीय स्वातंत्र्य लढ्यात तरुणाईचा एलगार असणारे नेताजी यांची जयंती यंदा पराक्रम दिन म्हणून साजरी करण्यात येणार आहे. आझाद हिंद सेनेच्या नेतृत्वाखाली “तुम मुझे खून दो, मैं तुमी आझादी दुंगा” चलो दिल्ली या ललकारी देऊन तरुणाई जागृत करुन त्यांच्यात राष्ट्रप्रेम व देशाभिमान जागृत केला. नेताजी याचा अर्थ जो सर्वांना बरोबर नेतो तो नेताजी असा आहे. सध्याच्या लोकशाही राज्यात नेत्यांची संख्या जास्त असून नेताजी यांचा वनवा जाणवतो. सध्याच्या तरुणाईला उच्च ध्येय, तत्त्व, प्रेरणा, दिशा देणाऱ्या नेताजीची गरज आहे.
तरुणाईने भूलभुलैया नेतृत्वाच्या आहारी जाण्यापरीस ज्याच्या विचाराने प्रेरीत होऊन जगण्याची उमेद निर्माण करणाऱ्या नेतृत्वाकडे खेचले जावे. दुसऱ्याच्या सावलीत आपले अस्तित्व निर्माण होत नाही. त्यासाठी स्वकर्तृत्व, तप, त्याग, समर्पण, सेवा याचे स्वरोपटे लावून अस्तित्व निर्माण केल्याशिवाय नेताजी घडणार नाहीत.