श्रीमंत रामराजेंच्या नेतृत्वात फलटण तालुक्यासाठी 123 कोटींचा निधी : श्रीमंत संजीवराजे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. 20 जुलै 2024 | फलटण | खरीप पेरण्या झाल्या पण पाऊस नसल्याने शेतकरी संकटात असताना त्याला मदतीचा हात देण्याऐवजी राजकारण करुन आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा विकासाला प्राधान्य देण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे अंदाज पत्रकिय तरतुदी मधून गत सप्ताहात सुमारे ६८ कोटी ३५ लाख रुपये आणि आता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून सुमारे ५४ कोटी ९५ लाख ६७ हजार रुपये मंजूर करुन आणल्याचे आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी निदर्शनास आणून दिले आहे.

महाराष्ट्र राज्याच्या सन २०२४ – २५ च्या नुकत्याच जाहिर झालेल्या अर्थसंकल्पात आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर व आ. दिपकराव चव्हाण यांच्या मागणीनुसार सुमारे ६८ कोटी ३५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाल्याची माहिती श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी दिली आहे.

या मंजूर निधीतून खालील कामे करावयाची आहेत.

१) प्रजिमा ९ पैकी २९ ते ३२ कि. मी. मधील फडतरवाडी ते जिंती या भागाची सुधारणा करणे २ कोटी ५० लाख रुपये,

२) प्रजिमा ९ पैकी ३ ते ६ कि. मी. मधील शिवेचा मळा ते सासवड रस्त्याची रुंदी करणासह सुधारणा करणे २ कोटी ५० लाख रुपये,

३) ग्रा मा १३८ हणमंतवाडी जवळ लहान पुलाचे बांधकाम करणे २ कोटी ७५ लाख रुपये,

४) प्रजिमा ८ मध्ये कि.मी. ८/५०० कॅनॉल वर पुलाचे बांधकाम करणे, ५ कोटी रुपये,

५) प्रजिमा १३ पवारवाडी ते हणमंतवाडी रस्ता रुंदी करणासह सुधारणा करणे ५ कोटी रुपये,

६) प्रजिमा ७ लंगुटेवस्ती ते बरड आणि टाकळवाडे ते राजाळे रस्ता सुधारणा करणे ५ कोटी रुपये,

७) प्रजिमा ९ कि. मी. क्रमांक ३७/०० नीरा नदीवरील मोठ्या पुलाचे जोड रस्त्यांसह बांधकाम करणे, आणि प्रजिमा ९ ते प्रजिमा ७३ पुणे जिल्हा जोड रस्त्यांसह खाजगी क्षेत्रासह भूसंपादन करणे ४५ कोटी ६० लाख रुपये असे एकूण ६८ कोटी ३५ लाख रुपये प्राप्त झाल्याचे श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी निदर्शनास आणून दिले.

तर आता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर व आ. दिपक चव्हाण यांच्या प्रयत्नातून ५४ कोटी ९५ लाख ६७ हजार रुपये खर्चाची ११ कामे मंजूर झाली असल्याचे श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी निदर्शनास आणून दिले.

त्यामध्ये आंदरुड शेरीचामळा ते कर्णेवस्ती रस्ता ४ कोटी १७ लाख ८४ हजार रुपये, जाधववाडी ते पवारवाडी (आसू) रस्ता ४ कोटी ८२ लाख ७५ हजार रुपये, पवारवाडी ते शिंदेनगर रस्ता ७ कोटी ३ लाख ६ हजार रुपये, टी आर १ ते निंबळक रस्ता ४ कोटी १४ लाख ८५ हजार रुपये, फलटण काळूबाई मंदिर ते बामणकी ओढा रस्ता ४ कोटी ४४ लाख ६ हजार रुपये, दुधेबावी ते वांजळे रस्ता ४ कोटी ६६ लाख ४ हजार रुपये, राजाळे ते सरडे रस्ता ६ कोटी ८२ लाख १२ हजार रुपये, बरड ते बागेवाडी रस्ता ३ कोटी ४८ लाख ८४ हजार रुपये, निंबळक ते मठाचीवाडी रस्ता ४ कोटी ९५ लाख १८ हजार रुपये, गिरवी ते बोडकेवस्ती रस्ता ५ कोटी २९ लाख ६३ हजार रुपये, राष्ट्रीय महामार्ग ९६५ ते सांगळे वस्ती रस्ता ५ कोटी ११ लाख ६१ हजार रुपये.


Back to top button
Don`t copy text!