स्थैर्य, फलटण : फलटण तालुक्यात कोरोना या महाभयंकर आजाराचे एकूण रुग्ण १२३ असून त्या मधील ६५ कोरोना रुग्ण बरे झालेले आहेत. सद्य स्थितीला ५० कोरोना रुग्णांवर उपचार चालू असून ८ कोरोना बाधितांचा कोरोना मुळे मृत्यू झालेला आहे, अशी माहिती फलटणचे उपविभागीय अधिकारी शिवाजी जगताप यांनी दिली. तर कोरोनाची वाढती रुग्णसंख्या फलटणकरांच्या दृष्टीने अतिशय चिंताजनक असून आगामी काळामध्ये जर असेच कोरोनाचे रुग्ण वाढत राहिले तर संपूर्ण लॉकडाऊन शिवाय प्रशासनाकडे पर्याय राहणार नाही, अशी चर्चा सध्या फलटण मध्ये सर्वत्र सुरु आहे.
काल (१२ जुलै) रोजी रात्री उशिरा आलेल्या रिपोर्ट नुसार मौजे सरडे येथील पूर्वी पाॅसिटीव्ह आलेल्या व्यक्तीच्या निकट संपर्कातील ५५ वर्षीय महिला व २० वर्षीय मुलीची कोरोना चाचणीचा अहवाल पॉसिटीव्ह आलेला आहे. कळंबोली येथून मौजे सासवड, ता. फलटण येथे आलेल्या ३० वर्षीय सारी आजराच्या रुग्णाच्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉसिटीव्ह आलेला आहे. दहिवडी येथील कोरोना रुग्णाच्या निकटच्या संपर्कातील मौजे हिंगणगाव येथील ३२ वर्षीय पुरुषाचा कोरोनाचा अहवाल पॉसिटीव्ह आलेला आहे. सातारा येथून प्रवास करून आलेल्या व सारी ह्या आजाराची लागण असलेल्या रविवार पेठ, फलटण येथील ३९ वर्षीय महिलेची कोरोना चाचणी पॉसिटीव्ह आलेली आहे. सारी आजार असलेल्या मौजे विंचुर्णी येथील ४३ वर्षीय पुरुषाची कोरोना चाचणीचा अहवाल पाॅसिटीव्ह आलेला आहे. सर्व नव्याने पॉसिटीव्ह आलेल्या रुग्णांची निकट संपर्कामध्ये आलेल्या व्यक्तींची माहिती घेण्याचे काम सुरु आहे, असेही उपविभागीय अधिकारी शिवाजी जगताप यांनी स्पष्ट केले.
काल (१२ जुलै) रोजी 2167 व्यक्ती होम क्वारंटाईन मध्ये असून त्यांचा १४ दिवसांचा कालावधी पूर्ण झालेला नाही. फलटण येथील कोरोना केअर सेंटरच्या कन्फर्म वार्ड मध्ये 21 रुग्ण असून सस्पेक्ट वार्ड मध्ये 56 जण आहेत. तर संस्थामक विलीगीकरण कक्षात कोणीही नाही. त्या सोबतच फलटण येथील काही कोरोनाबाबतचे काही अहवाल प्रलंबित असल्याचेही उपविभागीय अधिकारी शिवाजी जगताप यांनी स्पष्ट केले.