दैनिक स्थैर्य । दि. १५ मार्च २०२३ । मुंबई । राज्याचा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडला. आज विधिमंडळात अर्थसंकल्पावर चर्चा सुरू आहे. विरोधकांनी शेतकऱ्यांना जाहीर केलेल्या नमो योजनेवर प्रश्न उपस्थित केले, या प्रश्नांना उत्तरे देत असताना आज देवेंद्र फडणवीस यांनी योजनेत मिळणाऱ्या रक्कमेचा हिशोब मांडला.
देवेंद्र फडणवीस म्हणाले,’केंद्र सरकारने ६ हजार रुपये शेतकऱ्याच्या खात्यात टाकण्याचा निर्णय घेतला, तुमच्या केंद्रातल्या नेत्यांनी तोच हिशेब मांडला. दिवसाला इतके, तासाला इतके २०१९ मध्ये त्यांचा पूर्ण सफाया झाला. तेव्हा विरोधकांनी सांगितलं त्याची कारणं शेतकऱ्याला ६ हजार रुपये दिले त्याचा परिणाम हा झाला, पण ज्यावेळी शेतकऱ्यावर नुकसानीची वेळ येते तेव्हा त्यांना हे सहा हजार रुपये वापरायला मिळतात. या बारा हजारात अजुनही वाढ होऊ शकते. तुमच्या मंत्रिमंडळात मुख्यमंत्र्यांनी ही सूचना मांडली होती, मी बघा मंत्र्यांनी मांडलेली सूचना लगेच ऐकली असा टोलाही फडणवीस यांनी लगावला.
सुरुवात म्हत्वाची असते ती आम्ही केली आहे, हा अर्थ संकल्प शेतकऱ्यांचा सन्मान करणार आहे. मी हा अर्थसंकल्प करत असताना मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचीही मदत घेतली आहे, असंही फडणवीस म्हणाले. यावेळी सभागृहात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना टोला लगावला. तुमच्या सरकारच्या काळात शिवसेनेला निधी कमी दिला. शिवसेना सगळ्यात मोठा पक्ष शिवसेना होता, त्यांना तुम्ही फक्त १५ टक्के निधी दिला, आता आमच्यासोबत सेनेचे ४० आमदार आहेत तरीही आम्ही ३४ टक्के निधी दिला आहे, ‘तुम्ही केली त्यांची कोंडी, म्हणून आम्ही मारली मुसंडी’; रामदास आठवलेंच्या स्टाईलमध्ये फडणवीसांनी विरोधकांना टोला लगावला.