वाई पोलीस ठाण्यातील १२ पोलीस कोरोना पोझिटीव्ह


स्थैर्य, सातारा, दि. १३ : सातारा जिल्ह्यात कोरोना विषाणुने थैमान घातले आहे. ग्रामिन भागात कोरोना बाधित रुग्ण सापडत असल्याने प्रशासनही चिंतेत आहे. अशात आता वाई पोलीस ठाण्यातील १२ पोलीस कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायल बाब समोर आली आहे. आज या पोलीसांचा कोरोना अहवाल पोझिटीव्ह आल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

वाई येथील एका वाहतुक कर्मचार्‍याला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर वाई पोलीस ठाण्यातील 16 पोलीस कर्मचार्‍यांना क्वारंटाइन करण्यात आले होते. त्या पैकी 12 जणांचे अहवाल आज पाॅझिटीव्ह आले आहेत. वाई पोलीस ठाण्यातील बारा पोलीसांना झाली कोरोनाची लागण झाल्याचे समजताच सातारा पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. सातारा पोलीस दलात एवढ्या मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण होण्याची पहिलीच वेळ आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!