दैनिक स्थैर्य । दि. १२ जुलै २०२३ । आटपाडी । कला व विज्ञान महाविद्यालय आटपाडी व राष्ट्रीय सेवा योजना , अर्थशास्त्र विभाग व श्रीराम ज्युनियर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक लोकसंख्या दिन कला व विज्ञान महाविद्यालय व श्रीराम ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवार दि.11 जुलै 2023 रोजी घेण्यात आला. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून भूगोल विभाग प्रमुख प्रा.डॉ. बाळासाहेब कदम होते. लोकसंख्या दिन साजरा करण्यामागील हेतू व लोकसंख्येच्या वाढत्या संख्येबद्दल मार्गदर्शन केले . व जगाच्या इतिहासात भारताची लोकसंख्या एक नंबरला पोहोचल्याचे सांगितले.त्यानंतर मराठी विभागाचे प्रा.डॉ.रामदास नाईकनवरे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. ते म्हणाले की लोकसंख्या वाढीवर गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे . एनएसएस कार्यक्रम अधिकारी , प्रा.डॉ.भारती देशमुखे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक केले. प्रा.अनिता निकम यांनी कार्यक्रमाचे आभार मानले यावेळी सीनियर व ज्युनिअर विभागातील प्रा.सारिका घाडगे, प्रा.सुप्रिया मोरे, सोनाली चौगुले, दिपाली अडसूळ, विद्यार्थी विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते.