
स्थैर्य, फलटण : येथील सरस्वती शिक्षण संस्था संचलित प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, कोळकी येथे इयत्ता 11 वी व इयत्ता 12 वी विज्ञान व वाणिज्य शाखेसाठी प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. विज्ञान शाखेत प्रवेश घेणार्या विद्यार्थ्यांसाठी आआयटी, एमएच-सीइटी, जेइइ, एनइइटी अशा विविध स्पर्धा परीक्षांसाठी तज्ज्ञ व्यक्तींचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन, व्यक्तीमत्व विकास व कौशल्ये विकासाच्यादृष्टीने तज्ज्ञ व्यक्तींची व्याख्याने, कार्यशाळांचे आयोजन. अनुभवी, उच्चविद्याविभूषित शिक्षक. औद्योगिक व वैज्ञानिक क्षेत्रभेटींचे आयोजन. सुसज्ज प्रयोगशाळा व डिजीटल क्लासरुमच्या माध्यमातून प्रभावी अध्ययन व अध्यापन आदी सुविधा उपलब्ध आहेत.
तसेच इंग्रजी माध्यमाची ‘वाणिज्य शाखा’ सुरु करणारी फलटण तालुक्यातील ही एकमेव शैक्षणिक संस्था असून विद्यार्थ्यांसाठी आनंददायी शैक्षणिक वातावरण व उत्कृष्ट शैक्षणिक निकाालाची प्रोग्रेसिव्हची परंपरा. एमकेसीएल चे अधिकृत मान्यताप्राप्त, प्रोग्रेसिव्ह आयआयटी सेंटर, संगणकीकृत अकौंटिंग कोर्सेस व प्रकल्प कार्य. नाविन्यपूर्ण क्षेत्रभेटी, विविध शैक्षणिक सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन. बँकिंग क्षेत्रातील विविध स्पर्धा परीक्षांसाठी तज्ज्ञ व्यक्तींचे विशेष मार्गदर्शन व शिबीरांचे आयोजन या सुविधा उपबल्ध करुन देण्यात आल्या आहेत.
तरी विद्यार्थ्यांनी आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी 02166-224488, 7028006233, 9765458651, 9096097532 या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.