सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने केंद्रीय मार्ग निधीतून दोन मोठ्या‌ पुलांच्‍या बांधकामासाठी ११० कोटी मंजूर

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १८ डिसेंबर २०२२ । चंद्रपूर । पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने केंद्रीय मार्ग निधीतुन चंद्रपूर जिल्‍ह‌्यात ११० कोटी रू. किंमतीच्‍या मोठया पुलांचे बांधकाम मंजूर करण्‍यात आले आहे. या पुलांच्‍या बांधकामासाठी केंद्रीय मार्ग निधीतुन निधी मंजूर व्‍हावा यासाठी श्री. मुनगंटीवार यांनी केंद्रीय भुपृष्‍ठ परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्‍याकडे सातत्‍याने पत्रव्‍यवहार व पाठपुरावा करून निधी मंजूर करविला आहे. याबद्दल  मुनगंटीवार यांनी श्री. नितीन गडकरी यांचे आभार व्‍यक्‍त केले आहे.

चंद्रपूर जिल्‍ह‌्यातील वैनगंगा जुनगांव-देवाडा-नांदगांव या रस्‍त्‍यावर अॅप्रोच रोडसह मोठ‌्या उंच पुलाचे बांधकाम करण्‍यासाठी 70 कोटी रू. निधी तर पोंभुर्णा तालुक्‍यातील नवीन राष्‍ट्रीय महामार्गपासून देवई-चिंतलधाबा-सोनापूर-मोहाळा-नवेगांव मोरे-दिघोरी–पिपरी देशपांडे ते जिल्‍हा सीमेपर्यंत सोनापूर-मोहाळा या दोन गावांमध्‍ये अंधारी नदीवर मोठया उंच पुलाचे बांधकाम करण्‍यासाठी 40 कोटी रू. निधी केंद्रीय मार्ग निधीतुन मंजूर करण्‍यात आले आहे. यासाठी श्री. मुनगंटीवार यांनी यासंदर्भात नितीन गडकरी यांच्‍याशी गेल्‍या वर्षभरापासून सातत्‍याने पत्रव्‍यवहार व पाठपुरावा केला आहे. नवी दिल्‍लीत श्री. गडकरी यांची भेट घेवून त्‍यांना विनंती देखील केली आहे. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या प्रयत्‍नांच्‍या फलस्‍वरूप सदर मोठ्या पुलांच्‍या बांधकामासाठी 110 कोटी रू. निधी केंद्रीय मार्ग निधीतून मंजूर करण्‍यात आला आहे.

या आधीही केंद्रीय मार्ग निधीच्‍या माध्‍यमातुन श्री. मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने अनेक महत्‍वपूर्ण रस्‍ते व पुलांची बांधकामे श्री. गडकरी यांच्‍या सहकार्याने मंजूर करण्‍यात आली आहे. प्रामुख्‍याने आक्‍सापूर-पोंभुर्णा-जानाळा मार्गाचे 25 कोटी रू. किंमतीचे दुरूस्‍तीकरण, चंद्रपूर-मुल-गडचिरोली मार्गाचे 15 कोटी रू. किंमतीचे दुरूस्‍तीकरण, मुल-चिंचाळा-भेजगांव-पिपरी दिक्षीत-येरगांव मार्गावरील उमा नदीवरील पुलाचे 10 कोटी रू. किंमतीचे बांधकाम, मुल-चामोर्शी रस्‍त्‍यावरील उमा नदीवरील 23 कोटी रू. किंमतीचे मोठया पुलाचे बांधकाम, कोलगांव ते विसापूर मार्गावर वर्धा नदीवर 56 कोटी रू. किंमतीचे मोठया पुलाचे बांधकाम, बल्‍लापूर तालुक्‍यातील मानोरा फाटा ते इटोली आणि इटोली-किन्‍ही–येनबोडी या रस्‍त्‍याचे 25 कोटी रू. किंमतीचे मजबुतीकरण व डांबरीकरणाचे काम, मुल तालुक्‍यातील मोरवाही गावाजवळ उमा नदीवर 24.29 कोटी रू. किंमतीच्‍या मोठया पुलाचे बांधकाम, डोंगरगांव या गावाजवळ उमा नदीवर 21.83 कोटी रू. किंमतीचे मोठया पुलाचे बांधकाम, मोहुर्ली-चंद्रपूर-जुनोना-सातारा-पोंभुर्णा –नवेगांव मोरे या रस्‍त्‍याचे 80 कोटी रू. किंमतीचे मजबुतीकरण व डांबरीकरण, पोंभुर्णा तालुक्‍यातील घाटकुळ येथे 50 कोटी रू. किंमतीचे मोठया पुलाचे बांधकाम आदी महत्‍वपूर्ण विकासकामे मंजूर करविली आहे.

आजवर विकासासंबंधी जी मागणी आम्‍ही श्री. गडकरी यांच्‍याकडे केली, ती प्राधान्‍याने त्‍यांनी पूर्ण केली आहे. विकासाची अभूतपूर्व दृष्‍टी लाभलेल्‍या या लोकनेत्‍याने या दोन पुलांसाठी 110 कोटी रू. निधी मंजूर करून चंद्रपूर जिल्‍हा वासियांना मोठी भेट दिली आहे. भविष्‍यातही विकासासंबंधी त्‍यांचे असेच उदात्त सहकार्य आम्‍हाला लाभेल, असा विश्‍वास व्‍यक्‍त करत सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आभार व्‍यक्‍त केले आहे.


Back to top button
Don`t copy text!