स्थैर्य, फलटण : फलटण उपविभागात काल (दिनांक १० जुलै) रोजी एकूण कोरोना बाधित असलेल्यांची संख्या १०७ आहे. त्यातील ५९ रुग्ण कोरोना मुक्त झालेले आहेत तर ८ जणांचा कोरोना मुळे मृत्यू झालेला आहे. तरी सध्या फलटण तालुक्यात कोरोना म्हणजेच कोव्हीड १९ चे ४० ऍक्टिव्ह रुग्ण म्हणजेच उपचार घेत असलेले रुग्ण आहेत. आज कोरोना पॉसिटीव्ह आलेल्या रुग्णांच्या हाय रिस्क कॉन्टॅक्ट म्हणजेच निकट सहवासातील संपर्क यादी बनवण्याचे काम सुरु आहे, अशी माहिती फलटणचे उपविभागीय अधिकारी शिवाजी जगताप यांनी दिली.
काल (दिनांक १० जुलै) रोजी 2816 व्यक्ती होम क्वारंटाईन असून त्यांचा १४ दिवसांचा कालावधी पूर्ण झालेला नाही. तर फलटण येथील कोरोना केअर सेंटर मधील कन्फर्म वार्ड मध्ये ३१ रुग्ण आहेत. व कोरोना केअर सेंटरच्या सस्पेक्ट वार्ड मध्ये ७० जण असून संस्थामक विलीगीकरणामध्ये कोणीही नाही. त्या सोबतच फलटण तालुक्यातील काही कोरोनाचे अहवाल प्रलंबित आहेत, असेही उपविभागीय अधिकारी शिवाजी जगताप यांनी स्पष्ट केले.