107 नागरिकास दिला आज डिस्चार्ज; 409 जणांचे नमुने पाठविले तपासणीला

स्थैर्य, सातारा दि. २४ :  जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 107 नागरिकास  घरी सोडण्यात आले असून 409 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

409 जणांचे नमुने पाठविले तपासणीला

स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 22, कराड 53, कोरेगाव 8, वाई 28, खंडाळा 1,  रायगाव 8, पानमळेवाडी 35, मायणी 4, महाबळेश्वर 25, पाटण 3, दहिवडी 7, म्हसवड 22, पिंपोडा 8, तरडगाव 28 व कृष्णा मेडीकल कॉलेज कराड येथील 148 असे एकूण 409 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत.

एकूण नमुने -278614

एकूण बाधित -54328

घरी सोडण्यात आलेले -51507

मृत्यू -1794

उपचारार्थ रुग्ण-1027

Back to top button
Don`t copy text!