स्थैर्य, सातारा, दि. २६ : सातारा जिल्ह्यात रोजच कोरोनाचा उद्रेक होत आहे. बाधित झपाट्याने वाढत असताना त्याच्या तुलनेत मृत्यूही वाढत आहे. रविवारी आणखी 7 जणांचा कोरोनाने बळी घेतला. त्यामुळे आता बळींची संख्या 113 झाली आहे. तर, 106 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने बाधितांचा आकडा 3203 वर जाऊन पोहोचला आहे. दरम्यान, 65 जणांनी कोरोनावर यशस्वी मात असून, नव्या 398 संशयितांना दाखल करण्यात आले आहे.
रविवारी पाटण तालुक्यातील महिंद येथील 92 वर्षीय वृद्धा, उंब्रज (ता. कराड) येथील 87 वर्षीय वृद्ध, वडगाव हवेली (ता. कराड) येथील 49 वर्षीय पुरुष, रविवार पेठ कराड येथील 52 वर्षीय पुरुष, वडूज (ता. खटाव) येथील 58 वर्षीय पुरुष अशा पाचजणांचा खासगी रुग्णालयात तर निगडी (ता. कोरेगाव) येथील 80 वर्षीय वृद्ध, कवठे (ता. खंडाळा) येथील 80 वर्षीय वृद्धा यांचा जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. आतापर्यत 113 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात रविवारी 65 जणांनी कोरोनावर मात केली. आतापर्यंत 1 हजार 743 जण कोरोना मुक्त झाले आहेत. तर 113 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अद्यापही 1 हजार 378 जणांचे रिपोर्ट अद्यापही प्रलंबित असल्याने त्यांच्या रिपोर्टची धास्ती लागली आहे.