दैनिक स्थैर्य । दि. ०८ एप्रिल २०२३ । फलटण । महाराष्ट्रातील सहकारी व खाजगी साखर कारखान्यांचे सन २०२२ – २३ मधील गाळप हंगामाची जवळपास सांगता झाली असून गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी अधिक गाळप झाले मात्र साखर उतारा कमी असल्याने साखर उत्पादन घटले आहे.
यावर्षी राज्यात १०६ सहकारी व १०४ खाजगी असे २१० साखर कारखाने सुरु होते, त्यांनी दि. ३० मार्च २०२३ अखेर १०४५.३५ लाख मे. टन ऊसाचे गाळप करुन १०४१.६६ लाख क्विंटल साखर उत्पादन केले आहे. सरासरी साखर उतारा ९.९६ % मिळाला आहे.
महाराष्ट्रातील सहकारी व खाजगी साखर कारखान्यांनी केलेले गाळप व साखर उत्पादन विभागनिहाय खालीलप्रमाणे –
कोल्हापूर विभागात २५ सहकारी व ११ खाजगी साखर कारखान्यांनी २३०.२७ लाख मे. टन ऊसाचे गाळप करुन २६३.१७ लाख क्विंटल साखर उत्पादन केले. सरासरी साखर उतारा ११.४३ % मिळाला.
पुणे विभागात १९ सहकारी व १३ खाजगी साखर कारखान्यांनी २२२.८९ लाख मे. टन ऊसाचे गाळप करुन २२५.०९ लाख क्विंटल साखर उत्पादन केले. सरासरी साखर उतारा १०.१० % मिळाला.
सोलापूर विभागात १९ सहकारी व ३१ खाजगी साखर कारखान्यांनी २२९.८३ लाख मे. टन ऊसाचे गाळप करुन २०५.५७ लाख क्विंटल साखर उत्पादन केले. सरासरी साखर उतारा ८.९४ % मिळाला.
अहमदनगर विभागात १७ सहकारी व ११ खाजगी साखर कारखान्यांनी १३५.२८ लाख मे. टन ऊसाचे गाळप करुन १३०.५८ लाख क्विंटल साखर उत्पादन केले. सरासरी साखर उतारा ९.६५ % मिळाला.
औरंगाबाद विभागात १५ सहकारी व ११ खाजगी साखर कारखान्यांनी १०८.३४लाख मे. टन ऊसाचे गाळप करुन १००.०६ लाख क्विंटल साखर उत्पादन केले. सरासरी साखर उतारा ९.२४ % मिळाला.
नांदेड विभागात १० सहकारी व २० खाजगी साखर कारखान्यांनी १०६.१५ लाख मे. टन ऊसाचे गाळप करुन १०६.३१ लाख क्विंटल साखर उत्पादन केले. सरासरी साखर उतारा १०.०२ % मिळाला.
अमरावती विभागात १ सहकारी व ३ खाजगी साखर कारखान्यांनी ७.७६ लाख मे. टन ऊसाचे गाळप करुन ७.४० लाख क्विंटल साखर उत्पादन केले. सरासरी साखर उतारा ९.५४ % मिळाला.
नागपूर विभागात ० सहकारी व ४ खाजगी साखर कारखान्यांनी ४.८३ लाख मे. टन ऊसाचे गाळप करुन ३.४८ लाख क्विंटल साखर उत्पादन केले. सरासरी साखर उतारा ७.२० % मिळाला.
सातारा जिल्ह्यात खाजगी व सहकारी१५ साखर कारखाने सुरु
सातारा जिल्ह्यात ८ सहकारी व ७ खाजगी असे एकूण १५ साखर कारखान्यांनी या वर्षीच्या हंगामात ९६ लाख ४५ हजार १८६ मे. टन ऊसाचे गाळप करुन ९९ लाख १७ हजार ८९० क्विंटल साखर उत्पादन केले. सरासरी साखर उतारा १०.२८ % मिळाला.
कल्लाप्पा आण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना लि., हुपरी संचलित श्रीराम सहकारी साखर कारखाना लि., फलटणने ४ लाख १७ हजार ५४४ मे. टन ऊसाचे गाळप करुन ४ लाख ८४ हजार ६०० क्विंटल साखर उत्पादन केले. सरासरी साखर उतारा ११.६१ % मिळाला आहे.
यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना लि., रेठरे बु|| ने १० लाख ५२ हजार ५० मे. टन ऊसाचे गाळप करुन ११ लाख २५ हजार ७५० क्विंटल साखर उत्पादन केले. सरासरी साखर उतारा १०.७० % मिळाला आहे.
किसन वीर सातारा सहकारी साखर कारखाना लि., भुईंजने ४ लाख ६० हजार ५४६ मे. टन ऊसाचे गाळप करुन ५ लाख ९ हजार ३०० क्विंटल साखर उत्पादन केले. सरासरी साखर उतारा ११.०६ % मिळाला आहे.
बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना लि., दौलतनगर ने २ लाख १६ हजार ९८३ मे. टन ऊसाचे गाळप करुन २ लाख ६१ हजार ७९० क्विंटल साखर उत्पादन केले. सरासरी साखर उतारा १२.०७ % मिळाला आहे.
सह्याद्री सहकारी साखर कारखाना लि., यशवंतनगर ९ लाख १० हजार ४०० मे. टन ऊसाचे गाळप करुन ११ लाख २७ हजार ७८० क्विंटल साखर उत्पादन केले. सरासरी साखर उतारा १२.३९ % मिळाला आहे.
अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना लि., शाहूनगर शेंद्रे ६ लाख ४७ हजार ९२० मे. टन ऊसाचे गाळप करुन ७ लाख ०७ हजार ३९० क्विंटल साखर उत्पादन केले. सरासरी साखर उतारा १०.९२ % मिळाला आहे.
रयत सहकारी साखर कारखाना लि., शेवाळेवाडी (अथनी शुगर) ४ लाख ५४ हजार ६२० मे. टन ऊसाचे गाळप करुन ५ लाख ५९ हजार २८० क्विंटल साखर उत्पादन केले. सरासरी साखर उतारा १२.३० % मिळाला आहे.
खंडाळा तालुका शेतकरी सहकारी साखर कारखाना लि., म्हावशीने १ लाख ३४ हजार ४१२ मे. टन ऊसाचे गाळप करुन १ लाख ३६ हजार ९१५ क्विंटल साखर उत्पादन केले. सरासरी साखर उतारा १०.१९ % मिळाला आहे.
श्री दत्त इंडिया प्रा. लि., साखरवाडीने ६ लाख ६३ हजार ८९१ मे. टन ऊसाचे गाळप करुन ४ लाख ३० हजार ७५० क्विंटल साखर उत्पादन केले. सरासरी साखर उतारा ६.४९ % मिळाला आहे.
गुरु कमोडिटी सर्व्हिसेस प्रा. लि., चिमणगावने १६ लाख २७ हजार ०३० मे. टन ऊसाचे गाळप करुन १६ लाख ४१ हजार ८०० क्विंटल साखर उत्पादन केले. सरासरी साखर उतारा १०.०९ % मिळाला आहे.
जयवंत शुगर्स लि., धावरवाडीने ६ लाख १३ हजार ३७० मे. टन ऊसाचे गाळप करुन ६ लाख ७८ हजार १५० क्विंटल साखर उत्पादन केले. सरासरी साखर उतारा ११.०६ % मिळाला आहे.
ग्रीन पॉवर शुगर लि., गोपुजने ५ लाख ३४ हजार ८१४ मे. टन ऊसाचे गाळप करुन ५ लाख ४२ हजार ६०० क्विंटल साखर उत्पादन केले. सरासरी साखर उतारा १०.१५ % मिळाला आहे.
स्वराज इंडिया ॲग्रो लि., उपळवेने ५ लाख १० हजार ३४६ मे. टन ऊसाचे गाळप करुन ४ लाख ३ हजार ५८५ क्विंटल साखर उत्पादन केले. सरासरी साखर उतारा ७.९१ % मिळाला आहे.
शरयू ॲग्रो इंडस्ट्रीज लि., कापशीने ७ लाख ८० हजार २६० मे. टन ऊसाचे गाळप करुन ५ लाख ९० हजार ९०० क्विंटल साखर उत्पादन केले. सरासरी साखर उतारा ७.५७ % मिळाला आहे.
खटाव माण तालुका ॲग्रो प्रोसेसिंग लि., पडळने ६ लाख २१ हजार मे. टन ऊसाचे गाळप करुन ७ लाख १७ हजार ३०० क्विंटल साखर उत्पादन केले. सरासरी साखर उतारा ११.५५ % मिळाला आहे.