दैनिक स्थैर्य । दि. १३ जुलै २०२१ । माण । माण तालुका बाजार समितीच्या निवडणुकीसाठी आज अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी 18 जागेसाठी 102 दाखल झाले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी विजया बाबर यांनी दिली.
विकास सेवा सोसायटीच्या 11 जागांसाठी 62 अर्ज दाखल झाले आहेत. यापैकी 7 सर्वसाधारणसाठी 42, 2 महिलांसाठी 8, 1-1 इतर मागास व विमुक्त जाती भटक्या जमाती प्रवर्गासाठी प्रत्येकी 6, ग्रामपंचायतच्या 4 जागांसाठी 25 अर्ज पैकी 2 सर्वसाधारणसाठी 13, 1-1 अनुसूचित जाती जमाती व आर्थिक दुर्बल घटकांसाठी प्रत्येकी 6 अर्ज दाखल झाले आहेत. व्यापारीच्या 2 जागांसाठी 13 तर हमाल तोलाईच्या एका जागेसाठी 2 अर्ज दाखल झाले आहेत.
हमाल तोलाईची छानणीत कसरत
हमाल तोलाईच्या एका जागेसाठी दोन अर्ज दाखल झाले आहेत. या अर्जाची छाननीमध्ये कसरत लागणार आहे. हमाल तोलाई मतदार संघात एकच मतदार आहे. त्यांनीच दोन अर्ज दाखल केले आहेत. एकच मतदार असल्याने त्यांना सूचक व अनुमोदक म्हणून कोणी सह्या केल्या अन हे सूचक व अनुमोदक छानणीच्या प्रक्रियेत टिकाव धरणार का याकडे लक्ष लागले आहे. त्या उमेदवाराला त्याच मतदार संघातील सूचक व अनुमोदक अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत आवश्यक असतात. मात्र एकच मतदार असल्याने दुसर्या मतदार संघातील सूचक व अनुमोदक यांच्या सह्या घेतल्या असणार त्या सह्या चालणार काय हे छावणीत कस लागून स्पष्ट होतअर्ज वैध की अवैध हे ठरणार आहे.