
स्थैर्य, सातारा, दि. 6 ऑक्टोबर : येथील श्री पंचपाळी हौद दुर्गा माता मंदिर चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सहस्त्रचंडी याग सोहळ्यात सोहळ्याच्या दुसर्या दिवशी म्हणजे रविवारी 5 ऑक्टोबर रोजी 1 हजार कुमारीकांचे पूजन करण्यात आले. यजमान दाम्पत्यांच्या हस्ते पूजन सोहळ्यामध्ये बारा वर्षापर्यंतच्या सर्व कुमारी मुलींचे पूजन हळद-कुंकू, फुल, अक्षदा, भेटवस्तू देऊन करण्यात आले.
दुर्गादेवीची विविध रूपे आहेत त्यामध्ये कुमारीका म्हणूनही दुर्गा देवीचे पूजन केले जाते, दरवर्षी नवरात्री उत्सवात घरोघरी ही कुमारीका पूजन करण्यात येते .या सोहळ्यानिमित्त हे पूजन करताना यजमान यांनी विशेष उत्साह घेतला .भेटवस्तू सोबतच या कुमारिकांचे पूजन करून खर्या अर्थाने या सोहळ्यात एक आगळावेगळा उपक्रम संपन्न झाला.
वेदमूर्ती विवेक शास्त्री गोडबोले म्हणाले, या अनुष्ठानाने परदेशात तसेच संपूर्ण जगात आपले जे सव्वा कोटीहून अधिक हिंदू बंधू-भगिनी आहेत, ते प्रचंड संकटात आहेत. त्यांचे रक्षण करावे तसेच आपल्या देशाचे जे काही प्रांत दुरावले आहेत. ते दुर्गादेवीने पुन्हा मिळवून द्यावेत. करण बांगलादेशातही ढाका राजधानीत ढाक्कादेवी आहे. पाकिस्तानात हिंगुलांबिका आहे. हे सर्व प्रांत पूर्वी भारताचेच होते. महाकाली, महासरस्वती व महालक्ष्मीने आम्हा सर्वांना ज्ञान, धन व बल मिळवून द्यावे. अखंड सामर्थ्य तुझ्याकडून प्राप्त व्हावे. स्वामी विवेकानंदांनी सनातन धर्माची व्याप्ती संपूर्ण जगात पटवून दिली. हेच कार्य पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मूळ हिंदुधर्माचे पुनरुत्थान होऊ दे. जगदंबेने आपल्याकडून गेलेली स्थाने आपल्याला परत मिळवून देत. सिंधू नदीसारखी आपल्या देशात पुन्हा खळाळून वाहू दे अशीच प्रार्थना करूया. कारण छोट्या गोष्टी परमेश्वराकडे मागण्यापेक्षा देवीने संपूर्ण जगातील असुरांचा नाश करावा. सध्याच्या काळात जगातील असुरी शक्ती या नाश पाहून दैवी शक्तीचा प्रकाश संपूर्ण जगात पडू दे हीच आपण जगदंबे चरणी प्रार्थना करू. या असे सांगितले.
वेदमूर्ती ओंकार शास्त्री बोडस म्हणाले , देवीचे स्वरूप कुमारी पाहताना तिची निरागसता शालिनीता म्हणून तिचे पूजन करण्यात येते सांगितले सहस्त्र चंडी म्हणजे सप्तशतीचे लाख पाठ. अशा प्रकारात 10 लाख पाठही केले जातात. त्याला 10 लक्षचंडी असे म्हणतात. दुर्गा सप्तशतीचा जन्म वणीच्या पर्वतावर झाला. 700 श्लोकांच्या या स्तोत्रांमध्ये विशिष्ट शक्तींचा उल्लेख केला आहे.
श्री समर्थ सेवा मंडळाचे अध्यक्ष गुरुनाथ महाराज कोटणीस म्हणाले, आपण बाह्य विषयात रंगून जातो. आपले आई बाप कोण हे कळत नाही. ज्यांना पूर्वीच आपले संयोजन देवाने केलेले आहे. मनातील आशा, लोभ यांना कसे मारायचे या विषयावरील हे सुरेख वर्णन संत एकनाथांनी आपले अभंगात केले आहे. योग्य वागाल ,षडरिपूंवर मात केली तर जीवनाची इति कर्तव्यता आपण साधन करू शकू, मिळवु शकू. संत ज्ञानेश्वरांनी आत्म सुखाचीया गोडी, ही प्राप्त होण्यासाठी जीवनाचा आनंद मिळवण्यासाठी इति कर्तव्यता मिळवण्यासाठी देव अंतरीच आहे. तो तुमच्यातच आहे, बाह्य आनंदात नाही देव, तुमच्या अंतरी असल्याचे समर्थ रामदास स्वामींनी सांगितल्याचे सांगितले.
दुर्गा माता मंदिरात सायंकाळी विविध यजमानांच्या हस्ते देवी मूर्तीला कुंकुमार्चन सोहळा संपन्न करण्यात आला. या कार्यक्रमासाठी महिलांचा विशेष उत्साह होता पती-पत्नी या कुमकुम सोहळ्यात सहभागी होऊन एक वेगळाच धार्मिक आनंद लुटला. दरम्यान गंधतारा ढोल पथकाच्या वतीने मंदिराच्या प्रांगणात सादर झालेले ढोल ताशाचे अतिशय सुरेख वादन हे लक्ष वेधून घेणारे होते. मंदिरात या या सोहळ्यानिमित्त केलेली विद्युत रोषणाई तसेच लावण्यात आलेले आकर्षक आकाश कंदील ही या सोहळ्याची आणखीनच आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणारे दिसून येत आहेत.
सहस्त्रचंडी याग सोहळ्यानिमित्त देवी मंदिरात दररोज सकाळी सहा वाजता काकड आरती आणि सायंकाळी महाआरती आयोजित करण्यात आल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष धनंजय देशमुख यांनी यावेळी दिली . सहस्त्रचंडी महायज्ञनिमित्त धार्मिक कार्यक्रमांंबरोबरच नजीकच्या समर्थ सदन सांस्कृतिक केंद्र येथे सायंकाळी सहा ते आठ या वेळेत विविध कीर्तन, प्रवचन, सत्कार संपन्न होत आहेत. यामध्ये सोमवार दि. 6 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा वाजता समर्थ सेवा मंडळाचे अध्यक्ष गुरुनाथ महाराज कोटणीस, सांगली यांचे सुश्राव्य प्रवचन होणार आहे. मंगळवार दि. 7 ऑक्टोबर ते गुरुवार दि. 9 ऑक्टोबर दरम्यान सायंकाळी सहा ते आठ या वेळेत पुणे येथील सुप्रसिद्ध राष्ट्रीय कीर्तनकार समर्थ भक्त चारुदत्त बुवा आफळे यांचे सुश्राव्य कीर्तन होणार आहे .
शुक्रवार दि. 10 ऑक्टोबर रोजी सायंकाळी वेदमूर्ती विवेक शास्त्री गोडबोले यांचा विविध मान्यवरांच्या उपस्थितीत भव्य नागरी सत्कार व समारोपाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे. रविवार दि. 12 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 ते 4 या वेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून मंगळवार दि. 14 ऑक्टोबर रोजी सकाळी दहा ते पाच या वेळेत कर्करोग तपासणी मोफत शिबिर तसेच विविध आजारांबाबत आरोग्य महा शिबिर आयोजित आयोजन करण्यात आले आहे. बुधवार दि. 15 ऑक्टोबर रोजी सकाळी दहा ते पाच या वेळेत रक्तदान महाशिबिराचे आयोजन करण्यात आले आहे .या सहस्त्रचंडी महायज्ञ यांच्या धार्मिक सोहळ्यासाठी राज्याच्या प्रमुख नेते, लोकप्रतिनिधी तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे सह विविध मान्यवरांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले असून या यज्ञाच्या आयोजनासाठी दुर्गा माता मंदिर चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष धनंजय देशमुख ,उपाध्यक्ष राजेंद्र साळुंखे ,सचिव शिवाजी उर्फ प्रशांत तुपे ,उपाध्यक्ष शिवाजी भोसले कोषाध्यक्ष प्रेमचंद पालकर यांचेसह हरीष शेठ, विनायक चिखलगे तसेच सर्व विश्वस्त व कार्यकारणी सदस्य हितचिंतक विशेष परिश्रम घेत आहेत.
सहस्त्रचंडी महायज्ञ साठी भक्तांकरीता 80 जी कलमानुसार देणगीदारांना इन्कम टॅक्स म्हणजेच आयकर खात्यातून सवलत मिळणार आहे तसेच या महायज्ञा साठी श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह मंडळचे अध्यक्ष सुभाषराव बागल, माजी नगराध्यक्ष अशोकराव मोने, समर्थ सेवा मंडळाचे कार्यवाह समर्थ भक्त योगेश बुवा रामदासी ,प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक श्रीधर कंग्राळकर,सातारा शिवसेना शहर प्रमुख निलेश मोरे, महेश राजेमहाडिक, चंद्रशेखर ढाणे, प्रकाश बडदरे तसेच सर्व साधक, सनातनी संस्था सातारा यांचे विशेष सहकार्य लाभत आहे.

