फलटण तालुक्यातील टाकुबाईच्यावाडीत १०० % लसीकरण; लसीकरण पुर्ण होणारे तालुक्यातील प्रथम गाव

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २८ सप्टेंबर २०२१ । फलटण । कोरोना विषाणू संसर्गापासुन स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी शासनाच्या आवाहनास प्रतिसाद देत फलटण तालुक्यातील टाकूबाईचीवाडी येथील १८ वर्षापुढील लोकांचे शंभर टक्के लसीकरण पुर्ण झाल्याची माहिती सरपंच कृणाल झणझणे यांनी दिली आहे. १००% लसीकरण पुर्ण करणारे ते तालुक्यातील पहिले गाव ठरले आहे. ग्रामस्थांनी लसीकरणाबाबत सजगता दाखवीत दोन्ही डोस घेतल्याने टाकूबाईचीवाडीकरांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

फलटण तालुक्यात कोरोना विषाणू पासून स्वतः सुरक्षित राहण्यासाठी १८ वर्षे वयोगटापुढील लसीकरणाचे दोन्ही डोस सर्व ग्रामस्थांनी घेतल्याने शंभर टक्के लसीकरण पुर्ण करणारे टाकूबाईचीवाडी हे फलटण तालुक्यातील पहिले गाव ठरले असल्याचे सरपंच कृणाल झणझणे यांनी सांगितले आहे. लसीकरण पुर्ण झाल्याने गत चार महिन्यांमध्ये या गावात कोरोनाबाधीत रुग्ण आढळला नाही. १० मार्च २०२१ ते १७ सप्टेंबर या कालावधीत हे लसीकरण टप्प्याटप्प्याने पुर्ण करण्यात आले.

गावातील १८ वर्षांपुढील एकुण एक हजार २०५ लोकांचे लसीकरण करण्यात आले, यामध्ये १८ ते ४५ वयोगटातील ३५५ पुरुष व ३२५ महिला असे एकुण ६८० जण तर ४५ वर्षापुढील २७२ पुरुष व २५३ महिला असे एकुण ५२५ जणांचा समावेश आहे. ग्रामस्थांनी लस घेण्यासाठी सरपंच कृणाल झणझणे यांना ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला.

सदर लसीकरणासाठी बिबी आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी, परीचारीका, आरोग्य सेवक, आशा, अंगणवाडी सेवीका, शिक्षक, पोलिस पाटील, ग्रामपंचायत कर्मचारी यांचे महत्वपुर्ण सहकार्य लाभले.

सुरुवातीस लसीबाबत संभ्रमाचे वातावरण होते. तेव्हा ग्रामस्थांना लसीकरणाचे महत्व सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी पटवुन दिले. लस उपलब्धतेसाठीही त्यांनी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर व फलटणचे आमदार दीपक चव्हाण यांच्यासोबतच माझ्याकडे सातत्याने पाठपुरावा केला त्यामुळेच टाकूबाईचीवाडी येथे १८ वर्षांपुढीलचे शंभर टक्के लसीकरण पुर्ण झाले. यामध्ये आरोग्य यंत्रणेचेही महत्वपुर्ण सहकार्य लाभले.
– धैर्यशील तथा दत्ता अनपट,
जिल्हा परिषद तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य, सातारा


Back to top button
Don`t copy text!