दैनिक स्थैर्य । दि. १४ ऑक्टोबर २०२२ । सातारा । कर्मवीर भाऊराव पाटील जयंती व रयत शिक्षण संस्थेचा संस्था वर्धापन दिन या कार्यक्रमांच्या निमित्ताने सामाजिक बांधिलकीची भावना मनात ठेवून महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्रसेनेचे विद्यार्थी, राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी. प्राध्यापक, प्राध्यापिका तसेच समाजातील इतर इच्छूक रक्तदात्यांनी या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन 100 बाटल्यांचे रक्तदान केले. अक्षय ब्लड बँक सातारा यांचे जनसंपर्क अधिकारी धीरज खुडे, सागर जाधव आणि त्यांचा स्टाफ यांनी विद्यार्थ्यांचा हिमोग्लोबीनची तपासणी करून विद्यार्थ्याना रक्तदानाचे महत्व महत्व पटवून दिले आणि रक्तदात्यांचे अभिनंदन केले. 22 महाराष्ट्र एन.सी.सी.बटालियनचे ट्रेनिग जे.सी. ओ. सुभेदार दीपक शिंदे आणि हवालदार संतोष वाघ यांनी रक्तदात्याना पुष्प गुच्छ व फळे वाटप करून रक्तदात्यांचे अभिनंदन केले.
रयत शिक्षण संस्थेचे सचिव व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ विठ्ठल शिवणकर, उपप्राचार्य डॉ.अनिलकुमार वावरे, डॉ.रामराजे मानेदेशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय छात्रसेनेचे कंपनी कमांडर लेफ्टनंट केशव पवार, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. नवनाथ इप्पर क्रीडा विभागाचे संचालक विक्रमसिंह ननवरे यांनी रक्तदान कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन केले.