IPL 2022 मध्ये खेळणार 10 टीम, ‘या’ महिन्यात होणार लिलाव

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य,मुंबई, दि १४: इंडियन प्रीमियर लीग 2022 (IPL 2022) मध्ये दहा टीम सहभागी होणार आहेत. यासाठी भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाने (BCCI) यावर्षी होणाऱ्या आयपीएल स्पर्धेच्या (IPL 2021) शेवटच्या टप्प्यात म्हणजेच मे महिन्यात लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली, सचिव जय शहा याांच्यासोबत बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची शनिवारी बैठक झाली. त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला.

बीससीसीआयच्या अधिकाऱ्यांनी नाव उघड न करण्याच्या अटीवर सांगितलं की, ‘पुढील आयपीएलमध्ये 10 टीम खेळणार आहेत. दोन नव्या टीमसंबंधीची सर्व प्रक्रिया मे महिन्यापर्यंत पूर्ण केली जाईल. ही मोठी प्रक्रिया आहे. मात्र त्यानंतर एकदा टीमची निवड झाली की त्या त्यांचा कारभार सुरू करतील.

कोण असेल मालक?

आयपीएलच्या दोन नव्या टीमचे मालक कोण असतील याची सर्वांना उत्सुकता आहे. या संंबंधीच्या वृत्तानुसार अदानी ग्रुप आणि संजीव गोयंका ग्रुप यामध्ये सर्वात आघाडीवर आहे. आयपीएलची एक टीम अहमदाबादची असू शकते. जी खरेदी करण्याची इच्छा अदानी यांनी यापूर्वीच व्यक्त केली आहे. अहमदाबादमध्ये जगातील सर्वात मोठं क्रिकेट स्टेडियम बनलं आहे. हे स्टेडियम नव्या टीमचं होम ग्राऊंड असण्याची शक्यता आहे.

स्पर्धेचे स्वरुप बदलणार?

IPL 2022 मध्ये 10 टीम खेळणार असल्यानं स्पर्धेचे स्वरुप देखील बदलण्याची शक्यता आहे. सध्या आयपीएल स्पर्धा राऊंड रॉबिन प्रकारात होते. ज्यामध्ये प्रत्येक टीम एकमेकांशी दोन मॅच खेळते. त्यानंतर जास्त पॉईंट्स मिळवणाऱ्या पहिल्या 4 टीम क्वालिफायरसाठी पात्र होतात.

दहा टीमसह याच प्रकारात स्पर्धा होण्याची शक्यता कमी आहे. सर्व टीम दोन गटांमध्ये विभागल्या जाऊ शकतात. अर्थात याबाबत अजून कोणतीही अधिकृत माहिती जाहीर झालेली नाही.


Back to top button
Don`t copy text!