दैनिक स्थैर्य । दि. १३ जानेवारी २०२३ । फलटण । प्रधानमंत्री ग्राम सडक योजने मधून फलटण तालुक्यामधील विविध रस्त्यांसाठी सुमारे दहा कोटी 32 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विशेष प्रयत्नांमधून प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेची कामे मंजूर करण्यात आलेली आहेत.
फलटण तालुक्यामधील खुंटे, येळकेवस्ती ते पाटणेवाडी या पाच किलोमीटरच्या रस्त्यासाठी तीन कोटी 45 लाख रुपयांचा निधी यासोबतच विडणी ते वडले या सहा किलोमीटर रस्त्यासाठी सुमारे चार कोटी 14 लाख रुपयांचा निधी व मुरूम, तडवळे ते काळज या सुमारे साडेचार किलोमीटर रस्त्यासाठी सुमारे दोन कोटी 73 लाख रुपयांचा निधी असा एकूण सुमारे दहा कोटी 32 लाख रुपयांचा निधी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विशेष प्रयत्नांमधून प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेमधून मंजूर करण्यात आलेला आहे.
प्रधानमंत्री ग्रामसडक योजने मधून फलटण तालुक्यामधील विविध रस्त्यांना निधी दिल्याबद्दल खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी पंतप्रधान ना. नरेंद्र मोदी व रस्ते वाहतूक मंत्री ना. नितीन गडकरी यांचे आभार मानले.