
दैनिक स्थैर्य | दि. 18 ऑगस्ट 2024 | फलटण | सातारा येथे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणाऱ्या “मुख्यमंत्री लाडकी बहीण” योजनेच्या शुभारंभासाठी फलटण शहरासह तालुक्यातील एक हजार ४५० महिलांना रवाना झाल्या आहेत. सदरील कार्यक्रमासाठी एकूण २९ बसेसचे नियोजन महिला व बालकल्याण विभागाच्या माध्यमातून करण्यात आले असल्याची माहिती बालविकास प्रकल्प अधिकारी सौ. प्रियांका गवळी यांनी दिली.
याबाबत अधिक बोलताना गवळी म्हणाल्या कि; प्रत्येक बस मध्ये अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा, ग्रामसेवक व तलाठी हे शासकीय कर्मचारी बसचे संनियंत्रण करणार आहेत. तसेच महिलांना सुरक्षित नेहून माघारी सुखरूप आणण्यासाठी सर्वच शासकीय यंत्रणा कार्यन्वित राहणार आहेत.