फलटणमध्ये आज ‘१ तारीख १ तास श्रमदान’ अभियान


दैनिक स्थैर्य | दि. ३० सप्टेंबर २०२३ | फलटण |
स्वच्छ सर्वेक्षण २०२३ अंतर्गत गांधी जयंती निमित्त फलटण नगरपरिषदेकडून उद्या, दि. १ ऑटोबर रोजी ‘१ तारीख १ तास श्रमदान’ अभियान राबविण्यात येत आहे.

या अभियानांतर्गत फिरंगाई मंदिर परिसर सोमवार पेठ, कुरेशी नगर मस्जिद परिसर टेंगुळ चौक, पाचबत्ती चौक परिसर, डॉ. साळुंखे परिसर, उंबरेश्वर चौक परिसर, शंकर मार्केट परिसर, उमाजी नाईक चौक परिसर, फलटण नगर परिषद शाळा क्र. ०७ परिसर, गजानन चौक परिसर, श्रीकृष्ण मंदिर परिसर, हॉटेल रायगड तसेच नवीन कोर्ट परिसर व बोहरी मस्जिद परिसर या ठिकाणी हे स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे.

या अभियानामध्ये सहभागी होण्यासाठी खालील लिंक किंवा यूआर स्कॅन करून उपरोत दिलेल्या ठिकाणांपैकी आपल्या जवळील ठिकाणी सहभागी व्हावे. आपला एक सहभाग आपल्या शहराला स्वच्छ बनवू शकतो, असे आवाहन फलटण नगर परिषदेकडून करण्यात आले आहे.

सहभागी होण्यासाठी https://swachhatahiseva.com या लिंकवर जावे किंवा यूआर कोड स्कॅन करावा.

 


Back to top button
Don`t copy text!