कारच्या व्यवहारात 1.70 लाखांची फसवणूक; मध्यस्थावर गुन्हा 

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

स्थैर्य, सातारा, दि.१९: स्वीफ्ट कारच्या खरेदी-विक्री करणार्‍या मध्यस्थाने साडेतीन लाखात व्यवहार होवूनही कार मालकाला अंधारात ठेवून पैशासाठी हेलपाटे मारायला लावल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी 1 लाख 70 हजाराची फसणूक केल्याप्रकरणी सातारा शाहूपुरी पोलिस ठाण्यात सुरज कांबळे या मध्यस्थावर गुन्हा दाखल झाला आहे. 

याबाबत फिर्यादी सौ. जान्हवी पार्थ पोळके यांनी शाहुपुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांचा मुलगा अलोक पोळके पुणे येथे नोकरीस असुन तो फिर्यादीच्या नावावर असलेली स्वीफ्ट कार वापरतो. ही कार सातार्‍यातील जुनी वाहने खरेदी – विक्रीचा व्यावसाय करणार्‍या सुरज राजेंद्र कांबळे रा. शुक्रवारपेठ याला विकण्याबाबत त्याचे बोलणे झाले होते. त्यानुसार सुरज कांबळे सप्टेंबर 2019 रोजी सायंकाळी पुणे येथे जावुन अलोक यास 30 हजार रुपये देवुन स्वीफ्ट कार घेवून सातारा येथे आला. त्यानंतर पार्थ पोळके सुरज कांबळे यांचेकडे कारचे पैसे मागण्यासाठी वारंवार जात होते. परंतु, सुरज कांबळे पैसे देत नव्हता. त्यामुळे पोळके यांनी शाहुपूरी पोलीस स्टेशनला तक्रार दिल्यानंतर त्याने पार्थ पोळकेंना 50 हजार व सौ. पोळके यांच्याकडे 1 लाख घरी आणून दिले. मात्र, ही कार साडेतीन लाखांना विकल्याने उर्वरित 1 लाख 70 हजार देण्यास तो टाळाटाळ करू लागला. तसेच गाडी विकत घेणार्‍या अर्जुन कदम यांच्या नावावर ट्रान्सफर ट्रान्सफर करण्यासाठी फॉर्मवर मुळ मालकाच्या सह्याऐवजी दुसर्‍या कोणाच्यातरी सह्या असल्याचे पोळके यांच्या निदर्शनास आले. त्याबाबत त्यांनी सुरज कांबळे व त्याचे वडील राजेंद्र कांबळे यांना विचारले त्यावर काहीही बोलायला तयार नाहीत. त्यानंतर फिर्यादीच्या बँक खात्यात प्रथम 60 हजार व नंतर 60 हजार असे एकुण 1 लाख 20 हजार रुपये जमा झाल्याचे दिसले तरी हे पैसे कोणी पाठविले, ते माहित नाही. तथापि, सुरज कांबळेकडे उर्वरीत रक्कम मागितली असता आजपावेतो त्याने सदरची गाडीची उर्वरीत रक्कम रुपये दिलेली नसल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीवरुन सुरज कांबळे याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!