स्थैर्य, मुंबई, दि.३०: मुंबईत नववर्षाच्या उत्सवापूर्वीच दोन वेगवेगळ्या कारवाईत अमली पदार्थ जप्त केले. पहिली कारवाई महसूल गुप्तवार्ता संचालनालयाने केली. मुलांच्या कपड्यांत ठेवलेले 1.5 कोटी रुपयांचे ड्रग्स ताब्यात घेतले. तर दुसऱ्या कारवाईत NCB ने 4 किलो गांजा आणि हशीश (अमली पदार्थ)सह एका व्यक्तीला अटक केली आहे. पकडलेले ड्रग्स मुंबईत होणाऱ्या रेव्ह पार्टींमध्ये वापरण्यात येणार होते.
दक्षिण आफ्रिकेतून आले होते 1.5 कोटींचे ड्रग्स
महसूल गुप्तवार्ता संचालनालयाकडून सांगण्यात आले की, मुलांचे कपडे कथितरित्या दक्षिण आफ्रिकेतून विक्रोळीत आले होते. एका अधिकाऱ्याने सांगितले की, DRIच्या मुंबईस्थित झोनल युनिटने दोन स्टीलच्या फ्लास्कमधून 497 ग्रॅम मादक पदार्थ जप्त केले आहेत. याची किंमत 1.5 कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. दक्षिण आफ्रिकेतील महिला स्मिथ या शहरातून विक्रोळीत येणाऱ्या एका पार्सलमधून या ड्रग्सची तस्करी करणार असल्याची माहिती संचालनालयाला मिळाली होती.
एका अधिकाऱ्याने सांगितले की, अंधेरी येथील आंतरराष्ट्रीय कुरिअर हब येथे हे ड्रग्स सापडले. तपासणी दरम्यान हे पदार्थ स्टीलच्या फ्लास्कच्या आतील आणि बाहेरील भिंती दरम्यान लपवलेले आढळले. हे ड्रग्स हस्तगत करण्यात आला असून एनडीपीएसच्या विविध कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रेव्ह पार्टीचे आयोजन करणाऱ्याला 11 किलो गांजासह पकडले
दुसर्या प्रकरणात, रेव्ह पार्टीची तयारी करत असलेल्या आयोजकाला ठाणे येथील वागळे इस्टेट परिसरातील मुलुंड चेक नाकाजवळ नार्कोटिक्स ब्युरोने अटक केली आहे. अशरफ मुस्तफा शाह असे आरोपीचे नाव आहे. अशरफकडे 4 किलो चरस आणि 11 किलो गांजा सापडला. शाहने आयोजित केलेल्या पार्टीत सामील होण्यासाठी अनेक तरुणांनी प्री-बुकिंग केले होते.