स्थैर्य, सातारा, दि.२०: येथील सोमवार पेठेतील एका घरामध्ये शाहूपुरी पोलिसांनी छापा टाकून अवैध विक्री करण्यासाठी ठेवलेला 1 लाख 32 हजारांचा गुटखा जप्त केला. संशीयतास ताब्यात घेण्यात आले आहे.
याबाबत माहिती अशी, सोमवार पेठेतील एका घरामध्ये राज्यात विक्रीस बंदी असलेला पानमसाला व सुगंधी तंबाख्नु असा गुटखा सदृश्य माल असल्याची खात्रीशीर माहिती शाहूपुरी पोलिसांना मिळाली. त्यानंतर शाहपुरी पोलिस ठाण्याचे सपोनि विशाल वायकर व त्यांच्या पथकाने त्याठिकाणी सायंकाळी 04.30 वाजता छापा टाकुन तपासणी केली. यावेळी पानमसाला व सुगंधी तंबाखू असा 1,32,254/ रुपये किंमतीचा गुटख्याचा माल मिळुन आला. पोलिसांनी मुद्देमाल व संशयीतास ताब्यात घेवुन पुढील कारवाईकामी अन्न व औषध प्रशासन विभाग, सातारा यांच्या ताब्यात दिले आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाकडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
ही कारवाई सहायक पोलीस अधीक्षक श्रीमती आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विशाल वायकर, संदिप शितोळे, पो.ना.लैलेश फडतरे, अमित माने, पो. कॉ. स्वप्निल कुंभार, ओंकार यादव, मोहन पवार, चालक मनोहर वाघमळे व अन्न व औषध प्रशासनाचे इम्रान हावलदार व अस्मीता गायकवाड यांनी केली आहे.