
स्थैर्य, फलटण, दि. ७ ऑक्टोबर : केंद्र आणि राज्य सरकारच्या संयुक्त विद्यमाने फलटण शहरात एक अद्ययावत ‘नमो उद्यान’ उभारण्यासाठी १ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि आमदार सचिन पाटील यांच्या प्रयत्नांतून हा निधी मंजूर झाला असून, लवकरच शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी या सुसज्ज उद्यानाचे बांधकाम सुरू होणार असल्याची माहिती माजी नगरसेवक अशोक जाधव यांनी दिली आहे.
जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, या उद्यानाचा भूमीपूजन सोहळा लवकरच पार पडणार आहे. या नव्या उद्यानामुळे फलटण शहरातील नागरिकांसाठी एक नवीन सार्वजनिक जागा उपलब्ध होणार आहे.