दैनिक स्थैर्य | दि. २२ फेब्रुवारी २०२४ | फलटण |
गोखळी (ता. फलटण) येथील ज्येष्ठ नागरिक ह.भ.प. हरीदास कोंडीबा खोमणे (अण्णा) यांचे वयाच्या ८९ व्या वर्षी बुधवारी सकाळी ९.१५ वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक विवाहित मुलगा, तीन विवाहित मुली, नातवंडे असा परिवार आहे.
भारती सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष, भारती महिला सहकारी पतसंस्थेचे संस्थापक राजेंद्र खोमणे सर यांचे वडील होत. ह.भ.प. हरीदास खोमणे यांना ‘अण्णा’ या टोपण नावाने ओळखले जात असे. सामाजिक, धार्मिक कार्याबरोबर आळंदी – पंढरपूर पायी वारी, भजन, कीर्तनात त्यांचा सहभाग असे.
राहत्या घरापासून निघालेल्या अंत्ययात्रेमध्ये फलटण, बारामती, इंदापूर, दौंड, माळशिरस परिसरातील सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, वैद्यकीय, राजकीय क्षेत्रातील मान्यवर समाजबांधव सहभागी झाले होते. गोखळी येथील स्मशानभूमीमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.