हरित वसुंधरा उपक्रमांतर्गत जागतिक पर्यावरण दिनी फलटण येथे वृक्षारोपण


दैनिक स्थैर्य । दि. ०१ जून २०२२ । फलटण । जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून नाईक निंबाळकर देवस्थाने व इतर चॅरीटीज ट्रस्ट, नीरा उजवा कालवा विभाग, वन विभाग, डॉ. महेश बर्वे आणि तुषार नाईक निंबाळकर यांच्या संयुक्त सहभागाने फलटण शहरात हरित वसुंधरा उपक्रमांतर्गत मोठ्या प्रमाणावर वृक्षराजी उभी करण्याचा निर्धार करण्यात आला आहे.

महाराष्ट्र विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी वाढते प्रदूषण नियंत्रणाचा ध्यास घेतला असून संपूर्ण सातारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण व वृक्ष संवर्धनाची चळवळ प्रभावीपणे राबविण्याचा निर्धार केला आहे. त्या पार्श्वभूमीवर फलटण हरित करण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे.

कै. अच्युत दत्तात्रय स्मृती हरित वसुंधरा उपक्रमांतर्गत अधिकार गृह इमारतीच्या पश्चिमेकडील भागात नीरा उजवा कालवा विभाग आणि वन खात्याच्या जागेत वड, पिंपळ, चिंच, उंबर, अर्जुन, हिरडा, बाभूळ, करंज, लिंब वगैरे देशी वृक्ष मोठ्या प्रमाणावर लावून शहरालगत मोठी वृक्ष राजी निर्माण करुन हरित फलटण संकल्पना साकारण्याच्या प्रयत्नातील पहिला टप्पा सुरु करण्यात येत आहे.

जागतिक पर्यावरण दिनी दि. ५ जून रोजी या उपक्रमाचा शुभारंभ श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर आणि श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.


Back to top button
Don`t copy text!