दैनिक स्थैर्य । दि. ०१ जून २०२२ । मुंबई । ईआरडब्ल्यू पाइप्सच्या सर्वांत मोठ्या निर्यातदार, ईआरडब्ल्यू जीआय पाईप्सची सर्वात मोठी उत्पादक आणि भारतातील सर्वांत मोठ्या लाइटिंग कंपन्यांपैकी एक सूर्या रोशनी लिमिटेडने ३१ मार्च २०२२ रोजी संपलेल्या तिमाही आणि आर्थिक वर्षासाठी लेखाकृत वित्तीय निकालांची घोषणा केली आहे. आर्थिक वर्ष २२ साठी प्रति समभाग ४ रूपयांच्या लाभांशाची शिफारस कंपनीने केली आहे.
कंपनीच्या महसूलात गतवर्षीच्या चौथ्या तिमाहीच्या तुलनेत यावर्षी ३४ टक्के वाढ झाली असून तो २३०१ कोटी रुपयांवर पोहोचला आहे यामुळे बी२सी आणि बी२बी अशा सर्व व्यवसाय विभागांत वाढ दिसून आली आहे. कंपनीचा ईबीआयटीडीए २७ टक्के वाढीसह १५४ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. वित्तीय खर्च कमी झाल्यामुळे आणि मूल्याधारित उत्पादनांचे एक सुदृढ मिश्रण असल्यामुळे कंपनीच्या करोत्तर नफ्यात ४१ टक्के वाढ झाली असून तो ८३ कोटींवर पोहोचला आहे.
आर्थिक वर्ष २०२१ च्या ५५६१ कोटी रूपयांच्या तुलनेत आर्थिक वर्ष २०२२ मध्ये कंपनीच्या महसूलात ३९ टक्क्यांची वाढ झाली असून तो ७७३१ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. कंपनीचा रोख नफा २३ टक्क्यांनी वाढून ३८५ कोटी रूपयांवर गेला आहे. कंपनीच्या करोत्तर नफा २९ टक्के वाढून एफवाय२२ मध्ये २०५ कोटी रूपये झाला. विविध व्यवसायांमध्ये इनपुट खर्चातील चलनवाढ प्रचंड वाढली नसती तर नफा आणखी वाढला असता.
सूर्या रोशनीचे व्यवस्थापकीय संचालक श्री. राजू बिस्ता म्हणाले की, “कंपनीने आतापर्यंत १ अब्जाचा महसुली टप्पा गाठला असून आम्हाला या सर्वाधिक महसुलाचा खूप आनंद झाला आहे. मी या उत्तम कामगिरीचे श्रेय आमच्या टीमच्या सातत्यपूर्ण प्रयत्न आणि नावीन्यपूर्णता, उत्पादन आणि बाजार विकास, प्रिमियमायझेशन आणि शक्तिशाली ब्रँड समभागांना देतो.”