
दैनिक स्थैर्य । दि. ०३ ऑगस्ट २०२२ । मुंबई । सिव्हिल्सडेली या यूपीएससी तयारीसाठी भारतातील अग्रणी विद्यार्थी-केंद्रित व्यासपीठाने पुणे शहरामध्ये त्यांच्या पहिल्या केंद्राच्या उद्घाटनाची घोषणा केली. पुणे आणि महाराष्ट्रातील यूपीएससी/एमपीएससी परीक्षांच्या इच्छुकांना परवडणारे कोचिंग देण्यासाठी केंद्राची रचना करण्यात आली असून अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे.
पुण्यातील चार रँकधारकांनी सिव्हिल्सडेलीला महाराष्ट्र उमेदवारांसाठी एक अनुकूल परिसंस्था आणि विशिष्ट सामग्री प्रदान करण्यासाठी प्रोत्साहन दिले आहे. अधिकृत उद्घाटनापूर्वीच पुणे केंद्रावर १०० हून अधिक विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहेत.
अद्वितीय प्रतिष्ठा असलेली सिव्हिल्सडेली हे आयएएस २०२१-२२ परीक्षेच्या तयारीसाठी सर्वोत्तम ऑनलाइन व्यासपीठ म्हणून उदयास आले आहे. भविष्यात संपूर्ण भारतात अशी आणखी ऑफलाइन केंद्रे स्थापन केली जातील.
सिव्हिल्सडेलीचे सह-संस्थापक श्री. सजल सिंग म्हणाले, “आमची शिकवण्याची पद्धत वर्षानुवर्षे परिपूर्ण झाली आहे. आम्ही मार्गदर्शन, टिकडॅम तंत्र, यादी, कथा, मुख्य उच्च स्कोअरिंग टिप्स आणि इतर विविध नवकल्पनांमध्ये अग्रस्थानी राहिलो आहोत, जे आता संपूर्ण उद्योगात ऑफर केले जाते. महाराष्ट्रातील तरूण महत्त्वाकांक्षी आणि इच्छुक आहेत. पुण्यात आमची नवीन सुविधा सुरू करून आम्ही त्यांना त्यांचे ध्येय साध्य करण्यास मदत करू इच्छितो.”
नवीन केंद्र १,००० हून अधिक इच्छुकांना सामावून घेईल आणि त्यांना त्यांच्या तयारीसाठी आवश्यक मार्गदर्शन प्रदान करेल, तसेच यूपीएससी / एमपीएससी तयारीसाठी विद्यार्थी-केंद्रित व्यासपीठ उपलब्ध करणे सुरू ठेवेल.