साहित्य निर्मिती प्रगल्भ समाज निर्माणासाठी व्हावी

धर्मवीर संभाजी महाराज मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । 5 मार्च 2025। फलटण । समाजातीला वाईट प्रवृतीवर वास्तव लिखाण करुन लेखणीने वार करण्याचे काम केले पाहिजेत. साहित्य निर्मिती केवळ पुरस्कारासाठी न करता प्रगल्भ समाज निर्माण करण्यासाठी व्हावी, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार रविंद्र बेडकिहाळ यांनी केले.

येथील अ‍ॅग्रो न्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित 8 वे धर्मवीर संभाजी महाराज मराठी साहित्य संमेलनात बोलत होते. अध्यक्षस्थानी जगनाथ शिंदे होते. कार्यक्रमास संमेलनाध्यक्ष सौ. सोनाली ढमाळ, स्वागताध्यक्ष श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर, प्रा. रविंद्र येवले, धैर्यशील देशमुख, सितारामन नरके, साहित्यीक व शिवप्रेमी उपस्थित होते.

ते म्हणाले की, फलटणच्या राजघराण्याने नेहमीच साहित्यिकांना उच्च दर्जा दिला. ग्रामीण भागातून साहित्यीक तयार झाले पाहिजेत यासाठी सर्वोतोपरी मदत दिली. ही परंपरा आजची पिढी जपत आहे. अँग्रोन्युज परिवाराचे काम नेहमीच समाज हिताचे चालले आहे. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हे महान लेखक कवी होते. त्यांच्या साहित्यावर आजही फारसा प्रकाश टाकला जात नाही. खरेतर वयाच्या चौदाव्या वर्षी बुद्धभूषण या सारख्या ग्रंथाची निर्मिती करून त्यांची समाजाप्रती असेलली तळमळ दिसून येते. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन महाराष्ट्राच्या साहित्य संस्कृतीचा मानबिंदू ठरेल असे गौरवोद्गार जगन्नाथ शिंदे यांनी काढले.

सौ. सोनाली ढमाळ म्हणाल्या की, ढाल ती, तीच तलवार कर्तृत्वाला तिच्या स्वाभिमानाची धार, समाजसेवा ही बोलून न होता कार्यातून दिसावी लागते. साहित्त्याप्रमाणे साहित्यिक आपल्या लेखनीलाच शस्त्र बनवून समाजातील अनिष्ठ रुढी परंपरा व अन्यायाला वाचा फोडतात.

यावेळी अस्थिरोगतज्ञ डॉ. प्रसाद जोशी, व डॉ. सौ. प्राची जोशी यांना धर्मवीर संभाजी महाराज साहित्य सेवा जीवनगौरव पुरस्कार व तिरकवाडी ता.फलटण येथील श्रीमती कांताबाई कोकरे यांना राष्ट्रमाता जिजाऊ आदर्श माता पुरस्कार प्रदान करण्यात आला तर महाराष्ट्र व गोवा येथून आलेल्या निवडक साहित्यीकांना धर्मवर छत्रपती संभाजी महाराज विशेष साहित्य सेवा, उत्कृष्ट साहित्य सेवा पुरस्कार देवून गौरवण्यात आले.

पुरस्काराला उत्तर देताना साहित्यीकांनी छत्रपतींच्या आजोळी मिळणारा सन्मान आमच्या भावी जीवनाला नक्कीच दिशादर्शक ठरेल, असे सांगितले. दुपारचे सत्रात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चषक काव्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये सातारा, नागपुर, गडचिरोली, मनमाड, पुणे, मुंबई, ठाणे, कोल्हापुर, सांगली, सोलापूर येथील कवींनी सहभाग नोंदवला. स्पर्धा परिक्षक म्हणून कवी सिताराम नरके यांनी काम पाहिले तर अध्यक्षस्थानी श्रेष्ठ विचारवंत प्रा. रविंद्र येवले होते. यावेळी पहिला चषक कवयित्री सौ. भारती खुळे यांनी तर दुसरा व तिसरा चषक पुणे येथील कवींनी पटकावले. संयोजक प्रकाश सस्ते यांनी प्रास्तावीक केले. प्रा. महादेव गुंजवटे यांनी आभार मानले. प्रा. नितीन नाळे व ज. तु. गार्डी यांनी सुत्रसंचालन केले


Back to top button
Don`t copy text!