साताऱ्याचा ओंकार शिंदे युपीएससीच्या निकालात राज्यात चौदावा; साताऱ्यात जल्लोषात स्वागत


दैनिक स्थैर्य । दि. ०१ जून २०२२ । सातारा । नुकत्याच लागलेल्या यु पी एस सी निकालात महाराष्ट्रत १४ वा क्रमांकावर उत्तीर्ण झालेले ओंकार राजेंद्र शिंदे हे नुकतेच साताऱ्यात दाखल झाले. साताऱ्यात आल्यानंतर त्यांचे कुटुंबीयांकडून आणि मित्रमंडळींकडून वाजत गाजत स्वागत करण्यात आले.

तसेच फटाक्यांची आतषबाजीही करण्यात आली. ओंकार यांनी यूपीएससी करण्यासाठी ते बेंगलोर येथे गेले होते. ओमकार हे सामान्य कुटुंबातील असून त्यांचे वडील सातारा जिल्हा परिषदेमध्ये अभियंता म्हणून कार्यरत होते.

२०१७ मध्ये त्यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. घरातील थोरला मुलगा असलेल्या ओमकार यांनी आपले ध्येय यूपीएससी शिक्षणावर केंद्रित केलं. आणि आई-वडिलांचे ध्येय आणि आईची अपेक्षा पूर्ण करण्यासाठी त्यांनी जिद्दीने अभ्यास करायला सुरुवात केली. आणि त्यांच्या या जिद्दीला यश प्राप्त झालेला आहे. देशाच्या रँक मध्ये त्यांचा क्रमांक ४३३ आहे. त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


Back to top button
Don`t copy text!