सातारा  जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांची सुरक्षा रामभरोसे

लोहमार्गाचे दुहेरीकरण; स्थानकांचे सुशोभीकरण पूर्ण, 152 किलोमीटर अंतरात पोलिस ठाणे गरजेचे


स्थैर्य, सातारा, दि. 3 डिसेंबर : मध्य रेल्वेचे मिरज- सातारा-पुणेदरम्यान दुहेरीकरणाचे काम पूर्णत्वास गेल्यामुळे गाड्यांची धावगती वाढली आहे. प्रवासी आणि मालगाड्यांची संख्या हळूहळू वाढणार आहे. अमृत भारत योजनेतून अनेक रेल्वे स्थानकांचे प्रवाशांच्या सोयीसुविधांसह सुशोभीकरण पूर्ण झाले आहे. मात्र, सातारा जिल्ह्यात रेल्वे प्रवासादरम्यान दरोडा, रॉबरी, चोरी, पॉकेटमारी, गर्दी, मारामारी आदी गुन्हेगारी कृत्य घडल्यास रेल्वे प्रवाशांना 144 किलोमीटर अंतरावर असलेल्या मिरज (जि. सांगली) लोहमार्ग पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवावी लागते. त्यामुळे प्रवाशांची प्रचंड गैरसोय होते. परिणामी, बहुतांश वेळा प्रवासी तक्रार देण्याचे टाळून गप्प बसणे
पसंत करतात. जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांची सुरक्षा रामभरोसे आहे. यामुळे सातारा रेल्वे स्थानकात लोहमार्ग पोलिस ठाण्याची निर्मिती करणे गरजेचे बनले आहे.

जिल्ह्यातील रेल्वे मार्ग डोंगराळ प्रदेश, शेतशिवारातून जात असल्यामुळे रेल्वेगाडीत भुरट्या चोर्‍या, जबरी चोरी, मारामारीसह रेल्वेच्या रुळांवर आत्महत्या, जनावरे अपघात, आकस्मिक निधन, शेतकरी आंदोलन, किरकोळ स्वरूपाच्या गुन्ह्यांसह गंभीर स्वरूपाचे गुन्हे घडत असतात. जिल्ह्यातील प्रवाशांना रेल्वेत, प्लॅटफॉर्मवर, स्टेशन परिसरात अथवा रेल्वे मार्गावर अपघात, गुन्हा घडला, तर तब्बल 144 किलोमीटर लांब असलेल्या मिरज (सांगली) येथील लोहमार्ग पोलिस ठाण्यात जाऊन फिर्याद द्यावी लागते. न्यायालयीन कामकाजासाठी जिल्ह्यातून दररोज पुणे आणि मिरज बाजूला 24 तासांत 14 ते 17 प्रवासी रेल्वे गाड्या, तर पाच ते आठ मालगाड्या धावतात. या दोन्ही बाजूंच्या मार्गावर रेल्वे गाडीने दररोज जिल्ह्यातील नोकरदार, कामगार, विद्यार्थी, व्यापारी, पर्यटक असे अंदाजे दोन ते अडीच हजारांवर लोक रेल्वेने प्रवास करतात.

कोरेगाव, कर्‍हाड, सातारा येथे जावे लागते. यामध्ये प्रवासी, फिर्यादीचा वेळ वाया जातो. आर्थिक स्वरूपात झळही बसते. परिणामी, गुन्हा घडला तरी गुन्हा नोंद करण्यात प्रवाशांमध्ये उदासीनता दिसून येते. वेळेअभावी प्रवाशांकडून गुन्हे दाखल केले जात नाहीत. एखादा गंभीर स्वरूपाचा गुन्हा घडल्यानंतर रेल्वे हेल्पलाइनवरून प्रवाशांनी मदत मागितली तर तत्काळ मदत मिळत नाही. मिरजवरून वरिष्ठ अधिकारी, पोलिस कर्मचारी आल्यानंतरच गुन्ह्यासंबंधी पुढील कार्यवाही होत आहे. सातारा रेल्वे स्टेशन हे सातारा जिल्हास्तरीय स्टेशन आहे. जिल्ह्यातून पुणे ते मिरज 126 किलोमीटर व लोणंद ते फलटण 26 किलोमीटर असा एकूण 152 किलोमीटर लांबीचा लोहमार्ग जातो. या मार्गावर सहा तालुकास्तरीय रेल्वे स्टेशन आणि नऊ लहान गावस्तरीय रेल्वे स्टेशन आहेत.

केवळ तीन लोहमार्ग दूरक्षेत्रे..जिल्ह्यात सातारा, कर्‍हाड, वाठार अशी तीन लोहमार्ग पोलिस दूरक्षेत्रे कार्यरत आहेत. मात्र, त्यात वरिष्ठ पोलिस निरीक्षक, पुरेसे पोलिस कर्मचारीनसल्याने व दूरक्षेत्रासाठी केवळ पाच ते सात लोहमार्ग पोलिस नेमणूक असल्याने गुन्ह्यांचा तपास जलद गतीने होताना दिसत नाही. उपलब्ध कर्मचार्‍यांवर कामाचा ताण पडतो. न्यायालयीन कामकाजासाठी जास्त प्रमाणात वेळ जातो. परिणामी, दाखलगुन्ह्यांचा तपास रेंगाळत राहतो. वार्षिक 20..0 ते 250 गुन्हेजिल्ह्यातील रेल्वे स्टेशन व प्रवाशांसंबंधी सर्व प्रकारच्या एकूण गुन्ह्यांचे प्रमाण सरासरी प्रतिमहिना 15 ते 20 असून, वार्षिक सर्वसाधारण गुन्हे प्रमाण सरासरी 200 ते 250 च्या जवळपास आहे.

…तर अधिकारी व कर्मचारी संख्या 35 होईल

सातारा येथे लोहमार्ग पोलिस ठाणे निर्मिती झाल्यास जिल्ह्यासाठी एक वरिष्ठ पोलिस निरीक्षक, एक सहाय्यक पोलिस निरीक्षक, दोन पोलिस उपनिरीक्षक, दोन पोलिस नि हवालदारांसह 30 पोलिस शिपाई असे प एकूण 35 पोलिस अधिकारी, कर्मचारी मिळतील. त्यामुळे जिल्ह्यातील रेल्वे मार्गावर घडलेले गुन्हे तत्काळ दाखल होतील. गुन्ह्यांचा तपास जलदगतीने होऊन रेल्वे प्रवाशांचे गैरसोय दूर होइल. जिल्ह्यातील रेल्वे स्टेशनवर घडणारे किरकोळ स्वरूपाचे गुन्हे, स्टेशन आणि परिसरात गुन्हेगारांचा वावर कमी होईल. रेल्वे प्रवाशांना सुरक्षितता मिळेल.

जिल्ह्यातील रेल्वे मार्ग लांबी,लोकसंख्या, घडणारे गुन्हे व प्रवाशांची सुरक्षा लक्षात घेऊन सातारा रेल्वे स्टेशनवर लोहमार्ग पोलिस ठाण्याची निर्मिती त्वरित करणे गरजेचे आहे. याबाबत केंद्रीय रेल्वेमंत्री, मुख्यमंत्री, गृहमंत्री, पालकमंत्री, खासदारांना वारंवार निवेदन देऊन मागणी केली आहे. त्याचा गांभीर्याने विचार व्हावा…विकास कदम, माजी सदस्य, सातारा रेल्वे स्टेशन स्थानिक सल्लागार समिती.


Back to top button
Don`t copy text!