दैनिक स्थैर्य । दि.०३ जानेवारी २०२२ । फलटण । सन २०२२ या वर्षातील होऊ घातलेल्या ऑनलाईन बदल्या, प्रा. शिक्षकांच्या प्रशासकीय स्तरावरील समस्या, प्रा. शिक्षक सहकारी बँक संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणूक, एम. एस. सी. आय. टी. प्रशिक्षण वसूली थांबविणे, प्रा. शिक्षकांसाठी कॅशलेस वैद्यकीय सुविधा सुरु करणे, जिल्हानिधी संकलन आदी महत्त्वपूर्ण विषयांबाबत साधक/बाधक चर्चा करुन सातारा जिल्हा एकल प्रा. शिक्षक सेवा मंच ठोस निर्णयासाठी प्रयत्नशील असल्याची ग्वाही देण्यात आली.
सातारा जिल्हा एकल प्रा. शिक्षक सेवा मंच जिल्हास्तरीय सहविचार सभा शिक्षक भवन, सातारा येथे नुकतीच संपन्न झाली. या सभेला जिल्हा सेवा मंच पदाधिकारी, जिल्ह्यातील सेवा मंचाचे तालुकाध्यक्ष व सरचिटणीस उपस्थित होते.
राज्यस्तरीय प्रोटॉन पुरस्कार एकल सेवा मंच सातारा जिल्हाध्यक्ष विकास खांडेकर यांना सोलापूर येथील समारंभात सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला, त्याबद्दल सातारा जिल्हा एकल प्रा. शिक्षक सेवा मंचाचेवतीने त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.