दैनिक स्थैर्य । दि. ३१ मे २०२२ । सातारा । सातारा एमआयडीसीतील बड्या उद्योजकांच्या बेकायदेशीर अतिक्रमणांवर लोक आयुक्तांच्या आदेशानुसार धडक कारवाई करण्यात आल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते आणि दिशा विकास मंचचे अध्यक्ष सुशांत मोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली सातारा शहरातील अतिक्रमणाच्या विरोधात सातत्याने शेवटपर्यंत कोणाच्या दबावाला बळी न पडता माझा लढा सुरूच राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
मोरे पुढे म्हणाले, ” सातारा शहराजवळ असणाऱ्या एमआयडीसीतील अनेक उद्योजकांनी वर्कशॉप उभे केले . अनेकांनी मंजूर प्लॅनप्रमाणे बांधकाम न करता अतिक्रमण केले होते यामध्ये हेम एजन्सिज , हिरा इंटरप्राईजेस, कूपर कार्पोरेशन झेड इंजिनीयर नंदकुमार माने यांच्यासह अनेकांची अतिक्रमणे होती एमआयडीसीतील अतिक्रमण संदर्भात 2021 मध्ये महाराष्ट्र औद्योगिक वसाहत कार्यालयाकडे वारंवार तक्रारी केल्या आणि कारवाई करण्यासाठी पाठपुरावा केला मात्र अधिकाऱ्यांनी दाद लागू दिली नाही त्यामुळे 8 डिसेंबर 2019 रोजी लोकायुक्तांकडे तक्रार केली या तक्रारीची दखल घेत लोकायुक्तांनी ही अतिक्रमणे तत्काळ काढण्यात यावे असे आदेश दिले
या आदेशानुसार 12 बड्या उद्योजकांच्या अतिक्रमणांवर एमआयडीसी कार्यालय सातारा यांना कारवाईचा बडगा उगारावा लागला आहे यामध्ये अनेक कंपन्यांनी जमिनीचा बेकायदेशीर वापर झाल्याचे स्पष्ट झाले आहे उदाहरणार्थ हेम एजन्सीने दोन हजार चौरस मीटर चे अतिरिक्त बांधकाम करून त्याची सुधारीत परवानगी घेतली नाही नंदकुमार माने या उद्योजकांनी सुद्धा 200 चौरस मीटर तिसऱ्या मजल्यावर अतिरिक्त बांधकाम केले तांबोळी अँड कंपनी, कूपर कार्पोरेशन, क्रिस्टल ग्रॅनाईट ,मार्बल हिरा फ्लोर अँड रोलर मिल अशा विविध कंपन्यांनी विनापरवाना पत्रा शेड ,अनधिकृत बांधकामे, सायकल स्टॅन्ड अशी जी अनधिकृत बांधकामे केली ती बांधकामे तात्काळ पाडण्यात यावीत असे आदेश लोकायुक्तांनी दिले होते त्यानुसार ही कारवाई सातारा औद्योगिक विकास महामंडळाच्या वतीने करण्यात आली आहे.
सातारा शहरातही अनेक ठिकाणी अनधिकृत बांधकामे झाली आहेत या बांधकामासंदर्भात मी वेळोवेळी तक्रारी दिल्या आहेत 1 जानेवारी ते 31 मे या सहा महिन्यांमध्ये सातारा शहरात तब्बल 87 अतिक्रमण यांची नोंद माहिती अधिकारातून उघड झाले असून या वेगवेगळ्या अतिक्रमणांच्या संदर्भात माझा उच्च न्यायालयामध्ये लढा सुरू राहणार आहे तसेच या टपऱ्यांच्या माध्यमातून जी आर्थिक कमाई करतात त्यांच्या नावांची ही येत्या दोन-तीन महिन्यात पोलखोल करणार असल्याचे सुशांत मोरे यांनी सांगितले ज्यांनी माझ्यावर आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप केले आहेत त्यांनी स्वतःची पहिली उंची तपासावी स्वतः आपण काय अर्थकारण करतो हे आत्मपरीक्षण करावे ज्यांनी माझे नाव घेऊन माझ्यावर आरोप केला त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचा इशारा सुशांत मोरे यांनी दिला आहे.