
स्थैर्य, सातारा, दि. 9 सप्टेंबर : सातारा शहरातील मध्यवर्ती बसस्थानकात दिवसभरात राज्य परराज्यातून सुमारे दोन हजार एसटी बसेसची ये-जा सुरू असते. त्यातच सध्या पावसाळ्यामुळे या बसस्थानकातील प्रतीक्षा कक्षाचा भाग सोडता इतरत्र सर्वत्र मोठ्या प्रमाणात व खोलवर खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांचा त्रास प्रवासी, वाहक, चालक यांना अनुभवावे लागत आहे. अनेकदा या खड्ड्यातून एसटी बसेस गेल्याने एसटी बसचे मोठ्याप्रमाणात नुकसान होत आहे. बसस्थानकाला लागलेले खड्ड्यांचे ग्रहण बसस्थानक व्यवस्थापन समितीने सोडवावे. प्रवाशांचा प्रवास सुखकर घडवावा अशी अपेक्षा प्रवासी करत आहेत. (छायाचित्र : अतुल देशपांडे,सातारा)