दैनिक स्थैर्य | दि. २२ फेब्रुवारी २०२४ | फलटण |
फलटण तालुक्यातील सांगवी येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी मान्यताप्राप्त, फलटण एज्युकेशन सोसायटीचे कृषी महाविद्यालय फलटणच्या कृषीकन्यांनी ग्रामीण जागरूकता कृषी कार्यानुभव व औद्योगिक जोड प्रकल्प २०२३-२४ कार्यक्रमांतर्गत शेतीशी निगडित असलेले एप्लिकेशन्स कसे वापरावे, याविषयी प्रात्यक्षिक सादर केले.
या एप्लीकेशन्सद्वारे खते, कीटकनाशके कशी खरेदी करावीत, त्याचबरोबर हवामानाची माहिती कशी घ्यावी, याची माहिती दिली. शेतकरी आपला शेतमाल या अॅप्सद्वारे कसे विकू शकतात, याचीदेखील माहिती शेतकर्यांना दिली.
कृषी महाविद्यालय फलटणचे प्राचार्य डॉ. यु. डी. चव्हाण सर, श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर सर, कार्यक्रम अधिकारी प्रा. स्वप्निल लाळगे सर, कार्यक्रम अधिकारी व विषय तज्ज्ञ प्रा. नीतीषा पंडित मॅडम, कार्यक्रम समन्वयक प्रा. नीलिमा धालपे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली कृषीकन्या भामे ऋतुजा, आगवणे प्रणिता, भिसे अनुजा, चौधर पूजा, कुंभारकर अंकिता व शिंगाडे तनुजा यांनी हे प्रात्यक्षिक सादर केले.