दैनिक स्थैर्य । दि. ०६ जून २०२२ । फलटण । फुले शाहु आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फौंडेशन च्या बहुउद्देशीय सत्यशोधक केंद्रातर्फे जागतिक पर्यावरण दिनी, रविवार दि.5 जुन2022 रोजी दुपारी 2 वाजता सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर व आमदार दीपक चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि त्यांचे साक्षीदार म्हणून सही घेऊन सत्यशोधक पै. उदय कोकाटे आणि सत्यशोधिका सायली जाधव यांना संस्थेच्या वतीने थोर समाजसुधारक महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांची फोटोफ्रेम व सत्यशोधक विवाह प्रमाणपत्र देण्यात आले. हा सोहळा हजारो जनसमुदायाच्या साक्षीने मोठ्या दिमाखात सजाई गार्डन , फलटण येथे पार पडला.
यायेळी संजीव राजे म्हणाले की महात्मा फुले यांनी कठीण काळात सत्यशोधक समाजाची स्थापना करून त्यांनी अनेक सत्यशोधक विवाह लावले ते कार्य आज विधीकर्ते रघुनाथ ढोक आपलेच परिसरातील महाराष्ट्र व इतर राज्यात लावत आहेत.पुढे राजे म्हणाले की कोकाटे जाधव प्रमाणे यापुढे सर्व समाजाने सत्यशोधक समाजाची कास धरत सत्यशोधक पध्द्तीने विवाह लावावेत ही काळाची गरज असून त्यामुळे नक्कीच अंधश्रद्धा कर्मकांड कमी होण्यास मदत होईल,असे देखील म्हंटले.
आमदार दीपक चव्हाण म्हणाले की महात्मा फुले यांच्या विचाराचे अनुकरण करीत समाजसेवक कोकाटे यांनी सर्व समाजाला दिशा देणारा हा समारंभ अनुकरणीय असा घडविला त्याला साथ जाधव परिवाराने दिला त्यामुळे अनिष्ठ रूढी परंपरेला छेद बसला याबद्दल दोन्ही परिवाराचे त्यांनी अभिनंदन केले.
या प्रसंगी सामाजिक वनीकरणाचे अधिकारी सौ .हर्षा जगताप ,फलटण नगर परिषदेचे विरोधी पक्ष नेते अशोक जाधव ,माजी नगरसेवक तुकाराम गायकवाड ,सातारा जिल्हा समता परिषदेचे अध्यक्ष राजेंद्र नेवसे, चौधरवाडीचे सरपंच चौधरी मंडम, प्रगतशील शेतकरी दीपक भोसले , ग्रंथ मित्र बाबासाहेब यादव, प्राचार्य सुधीर इंगळे ,मुंबई मार्केट कमिटीचे संचालक राजाराम पवार ,आदर्श बहुजन शिक्षक संघाचे अध्यक्ष जयवंत तांबे , उपाध्यक्ष राजेश बोराटे , बापु गायकवाड ,पत्रकारसंघाचे तालुका अध्यक्ष राजेंद्र भागवत ,सृजन फौंडेशन चे अध्यक्ष अजित जाधव व सत्यशोधक चळवळीचे अनेक कार्यकर्ते मान्यवर मडळी उपस्थित होती.
या कार्यक्रमाचे सुरवातीला मुकुंदराव काळोखे यांनी संस्थेची व वेगवेगळ्या उपक्रमाची माहिती देत सातत्याने प्रबोधनात्मक कार्यक्रम राबवीत असतो म्हणूनच आज हा सोहळा पहाण्यासाठी मोठी व दर्दी गर्दी जमा झाली आहे, त्यामुळे नक्कीच लोकांमध्ये जागृती होईल . तर डॉ .सुरेश उबाळे यांनी सत्यशोधक विवाहाबाबत व पहिला सत्यशोधक विवाह महात्मा फुले यांनी लावला त्याची माहिती दिली. यावेळी सायली व उदय यांनी प्रथम महापुरर्षाचे विचार आचार आत्मसात करून प्रसार करणार म्हणून मशाल पेटवली त्याला आईवडील यांनी साथ देतील म्हणून त्या मशालीत तेल टाकले त्यांतर भारताचे सविधान व महात्मा फुले समग्र वाड्मय हातात घेऊन पुलाच्या पायघड्यावरून ,पारंपरिक सनई,तुतारी,डपली वादन करीत आगमन केले आणि महात्मा व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास हार अर्पण केला तर दोघांचे आईवडील यांनी छत्रपती शिवाजी महाराज .लोकमाता अहिल्याराणी , क्रांतीकारी उमाजी नाईक आणि घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोला हार घातला. यावेळी आई वडील व मामामामी यांचा राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे वतीने मान्यवराचे हस्ते सन्मानपत्र देऊन सन्मानित केले.तर कु.सलोनी आणि प्रा.सतीश आडेकर यांनी महात्मा रचित मंगलाष्टकं व काव्याचे गायन करून या सोहळ्यास उंची आणली म्हणून त्यांचा देखील जेष्ठ पत्रकार राजेंद्र भागवत यांचे हस्ते सन्मानप्रमाणपत्र देऊन आभार मानले. कोकाटे जाधव परिवाराने सर्वाना येताना गुलामगिरी आणि शिवाजी कोण होता हे ग्रंथ तर जाताना कोंणाला अंजीर, सीताफळ ,आवळा ,व पेरू अशी फळझाडे भेट दिली त्यामुळे परिसरात व मांडवात या आदर्श विवाहाची, तसेच पर्यावरण दिनाची चांगलीच चर्चा रंगली होती. हा सत्यशोधक विवाह विधीकर्ते फुले एज्युकेशन चे अध्यक्ष सत्यशोधक रघुनाथ ढोक यांनी नेहमीप्रमाणे महात्मा फुले यांचे वेशभूषेत मोफत लावला. तर मोलाचे सहकार्य आयोजक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शैक्षणिक व सामाजिक विचारमंच, चौधरवाडी तसेच पाडेगाव सामाजिक विकास फौंडेशन चे सर्व पदाधिकारी व गिरीश बनकर ,प्रशांत ढावरे ,सूत्रसंचालन पत्रकार शशिकांत सोनवलकर यांनी केले. जागतिक पर्यावरणाची माहिती देत उद्देशिका वाचन एकपात्री प्रयोगकार प्रा.शुभागी शिंदे फलटणकर यांनी केले आणि शेवटी आभार तुकाराम कोकाटे यांनी मानले. या प्रसंगी अन्नाची नासाडी होती म्हणून तांद्ळ ऐवजी अक्षता म्हणून सुगंधी पुलाच्य पाकळ्या वापरण्यात आले.