दैनिक स्थैर्य | दि. २५ फेब्रुवारी २०२४ | फलटण |
श्री सद्गुरु हरिबुवा साधू महाराज पुण्यतिथी उत्सव साजरा करण्यात आला. या सप्ताहात श्रीमद् भागवत कथा, महिला भजनी मंडळाचे भजन, सांप्रदायिक भजन, प्रवचन आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
पुण्यतिथी माघ शुद्ध एकादशी मुख्य दिवशी श्री सद्गुरु हरिबुवा महाराज यांना लघुरुद्र अभिषेक होऊन दुपारी पंचक्रोशीतील भजनी मंडळाची भजन सेवा तसेच दादा महाराज भजनी तसेच ॐ दत्त चिले ॐ भजनी मंडळाची सुश्राव्य अशी भजन सेवा संपन्न झाली.
पुण्यतिथी, एकादशी, मुख्य दिवस या दिवशी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर (माजी अध्यक्ष जिल्हा परिषद सातारा), श्री. दिलीपसिंह भोसले (माजी नगराध्यक्ष, फलटण), श्री. हेमंत रानडे (श्री सद्गुरु हरिबुवा महाराज ट्रस्टी), श्री सद्गुरू हरिबुवा महाराज मठाचे मठाधिपती श्री. चंदुकाका वादे, श्री. कीरकीरे सर, श्री. शंकर गुंजवटे व भाविक भक्तांनी दर्शनाचा लाभ घेतला.
संध्याकाळी श्री सद्गुरु हरिबुवा महाराज यांची पालखीतून टाळमृदूंगांच्या गजरात फलटण नगरीतून पालखी प्रदक्षिणा होऊन पुण्यतिथी सोहळ्याची सांगता करण्यात आली.