दैनिक स्थैर्य । दि. ०८ जून २०२२ । सातारा । श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा 2022 सातारा जिल्ह्यातून दि. 28 जून ते दि. 4 जुलै 2022 या कालावधीत मार्गक्रमण करणार आहे. पालखी सोहळ्याचा जिल्ह्यातील कार्यक्रम खालील प्रमाणे राहील.
दि. 28 जून 2022 रोजी सकाळी निरा पुल येथे सकाळचा विसावा व दुपारचा नैवेद्य तसेच दुपारचा विसावा राहील तर मुक्कामी लोणंद येथे राहील. दि. 29 जून रोजी लोणंद येथे मुक्काम दि. 30 जून रोजी लोणंद येथून प्रस्थान चांदोबाचा लिंब (उभे रिंगण नं. 1) दुपारचा विसावा व रात्रीचा मुक्काम तरडगांव येथे राहील. दि. 1 जुलै रोजी तरडगांव येथून प्रस्थान दत्त मंदिर काळज येथे सकाळचा विसावा. निंभेरे ओढा येथे दुपारचा नैवेद्य तर वडजल व फलटण दुध डेअरी येथे दुपारचा विसावा राहील. फलटण (विमानतळ) येथे मुक्काम राहील. दि. 2 जूलै रोजी फलटण (विमानतळ) येथे मुक्काम राहील. दि. 3 जुलै रोजी फलटण येथून प्रस्थान विडणी येथे सकाळचा विसावा. पिंपरद येथे दुपारचा नैवेद्य निंबळक फाटा येथे दुपारचा विसावा तर रात्रीचा मुक्काम बरड येथे राहील. दि. 4 जुलै 2022 रोजी बरड येथून प्रस्थान. साधुबुवाचा ओढा येथे सकाळचा विसावा. धर्मपुरी पाटबंधारे बंगला कॅनालजवळ दुपाचा नैवेद्या. शिंगणपूर फाटा (पानसकरवाडी) येथे दुपारचा विसावा तर रात्रीचा मुक्काम नातेपुते जि. सोलापूर येथे राहील.