श्रीराम संकुलात यशवंतराव चव्हाण यांची जयंती उत्साहात

रक्तदान शिबीरासह विविध कार्यक्रमांचे आयोजन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । 13 मार्च 2025। फलटण । येथील यशवंतराव चव्हाण हायस्कूल, सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूल, नामदेवराव सूर्यवंशी (बेडके) महाविद्यालय व सौ. वेणूताई चव्हाण डी. फार्मसी कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. यशवंतराव चव्हाण यांची जयंती विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली.

सुरुवातीला श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे सदस्य महेंद्र सुभाषराव सूर्यवंशी (बेडके) यांच्या हस्ते जिंती नाका येथील स्वर्गीय यशवंतराव चव्हाण व स्वर्गीय सौ. वेणूताई चव्हाण यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष सी. एल. पवार, मानद सचिव डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके), महेंद्र सूर्यवंशी (बेडके), रिद्धिमान सूर्यवंशी (बेडके), शिवाजीराव बेडके, हनुमंतराव निकम, जेष्ठ पत्रकार रवींद्र बेडकेहाळ, आवटे, आपटे, बर्गे, सावंत सर व चारही शाखांचे प्राचार्य, उपप्राचार्य यांच्या हस्ते स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेचे पूजन पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

ज्येष्ठ पत्रकार रवींद्र बेडकेहाळ म्हणाले, स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या जीवनातील महत्त्वाची सूत्रे याविषयी माहिती सांगितली. स्व.यशवंतराव चव्हाण यांनी कौटुंबिक नाती कधीही सोडली नाही . पुणे येथे नातेवाईकांना बोलावून चौकशी करत होते. कुटुंब भक्कम तर राष्ट्र मजबूत हे विचार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचे होते. लहानपणापासूनच देशभक्तीने ते प्रेरित झाले होते. त्यांच्याकडे अनेक महत्त्वाची पदे होती. सध्या महाराष्ट्राने यशवंतरावांचे विचार सोडले आहेत म्हणून आज महाराष्ट्राची ही अवस्था झाली आहे.
उपप्राचार्य पी. डी. घनवट यांनी स्व. यशवंतराव चव्हाण यांची जयंती व डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके) यांच्या वाढदिवसानिमित्त संस्थेच्या विविध शाखांमध्ये वक्तृत्व स्पर्धा, दंततपासणी शिबिर, रक्तदान शिबिर, विद्यार्थ्यांना खाऊ वाटप असे उपक्रम राबविण्यात आले आहेत.

आपटे म्हणाले, स्व. यशवंतराव चव्हाण यांनी समाजातील सर्व घटकांचा विचार करून राज्य केले. स्वतःच्या कार्याने महाराष्ट्रात त्यांनी वेगळा ठसा निर्माण केला. जबाबदारीचे जाणीव असलेले ते राजकीय नेते होते. आवटे यांनी आपल्या मनोगतातून यशवंतराव चव्हाण यांचा दूरदृष्टी कोण व सुसंस्कृतपणा अनेक उदाहरणांनी सांगितला.

यावेळी आदर्श शिंदे, श्रेयणी तगारे, श्रावणी नाळे, आर्यन ननावरे, श्रेया भोसले व शितल खिलारे या विद्यार्थ्यांनी स्व. यशवंतराव चव्हाण यांच्याविषयी माहिती सांगितली.

बारामती येथील इंडियन डेंटल असोसिएशन यांच्यावतीने दंत तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. डॉ. तेजस्विता देशपांडे व त्यांच्या टीमने विद्यार्थ्यांच्या दातांची तपासणी केली. तसेच फलटण मेडिकल फाउंडेशनच्यावतीने रक्तदान शिबिर आयोजित केले होते. यामध्ये महेंद्र सुभाषराव सूर्यवंशी (बेडके), व शिक्षक, शिक्षिका व विद्यार्थी यांनी रक्तदान केले.

सी. एल. पवार यांच्या हस्ते प्रशालेतील विद्यार्थी विद्यार्थिनींना खाऊचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाकरिता चारही शाखांमधील सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. प्राचार्य एस. बी. थोरात व उपप्राचार्य पी. डी. घनवट यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्न केले. एस. के. अडसूळ यांनी सूत्रसंचालन केले. एस. जी. धुमाळ यांनी आभार मानले


Back to top button
Don`t copy text!