दैनिक स्थैर्य । दि. ०९ जून २०२२ । सातारा । बेकायदेशीर वेतन कपातीचा अर्धवट परतावा आणि यूजीसी रेगुलेशन ची अर्धवट अंमलबजावणी याविरोधात शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघ आंदोलनाच्या पवित्र्यात आहे या आंदोलनामध्ये सातारा जिल्ह्यातील सर्व प्राध्यापकाने सहभागी होऊन आंदोलन यशस्वी करावे असे आवाहन विद्यापीठ शिक्षक संघ जिल्हा शाखेच्या अध्यक्ष डॉक्टर इशा जोगी यांनी पत्रकार परिषदेत केले आहे. यावेळी कार्यवाह डॉक्टर सोहन मोहोळकर आणि खजिनदार डॉक्टर तानाजी कांबळे उपस्थित होते.
डॉक्टर जोगी पुढे म्हणाल्या वेतन कपातीचा अर्धवट परतावा आणि यूजीसी रेगुलेशन ची अर्धवट अंमलबजावणी याविरोधात शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघाने आंदोलनाचा पवित्रा घेतला आह8 मे 2022 रोजी अमरावती विद्यापीठात विद्यापीठ संघाच्या झालेल्या बैठकीत या सर्व विषयांवर चर्चा होऊन आंदोलनाची दिशा निश्चित झाली होती महाराष्ट्रातील प्राध्यापकांनी 4 फेब्रुवारी ते 10 मे या काळात परीक्षा बहिष्काराचे आंदोलन केले होते या आंदोलन काळातील पगार तत्कालीन शासनाने कपात केला होता त्या विरोधात संघटनेने सर्वोच्च न्यायालयात लढाई जिंकून न्यायालयीन आदेशाची प्रतही विद्यापीठाला सादर केली मात्र या आदेशाची शासनाने अंमलबजावणी केली नाही विद्यापीठ अनुदान आयोगाचे रेगुलेशन हे बंधनकारक असताना शासनाने सोयीचा दुरुस्त्या करून शासन आदेश निर्गमित केला त्यामुळे पदोन्नतीच्या पीएचडी व वेतनवाढीच्या लाभापासून प्राध्यापक वंचित राहिले आहेत.
23 जानेवारी 2019 च्या उच्च न्यायालय निर्णयाची अंमलबजावणी करण्यात यावी 71 दिवसाचा परीक्षा कालावधीतील वेतन पूर्ण जमा करण्यात यावे 7 डिसेंबर 2020 रोजीच्या शासन निर्णयातील संप हा शब्द बघावा रेगुलेशन अॅक्ट ची जशीच्या तशी अंमलबजावणी करावी आयकर कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करावी व पाच जानेवारी 2019 च्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतील निर्णय येथील थकबाकी देण्याचा भाग वगळून शासन आदेश निर्गमित करण्यात यावा या आदेशाची शिक्षण मंत्र्यांनी घटनात्मक जबाबदारी स्वीकारून पुढील आदेश पारित करावे अशी मागणी शिवाजी विद्यापीठ संघाच्या वतीने करण्यात आली आहे या मागण्या मान्य झाल्या नाही तर विशेषांकाचे प्रकाशन काळ्या फिती लावून धरणे आंदोलन विद्यापीठ स्तरावर मेळाव्याचे आयोजन संचालक उच्च शिक्षण पुणे यांच्या कार्यालयावर मोर्चा विद्यापीठ कार्यालयावर मोर्चा माननीय कुलगुरूंना हस्तक्षेप न झाल्याबद्दल सादर करणे व मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना निवेदन सादर करणे असे आंदोलनाचे विविध टप्पे ठरवण्यात आले आहेत यावेळी पत्रकार परिषदेस सुटाचे अध्यक्ष आर के चव्हाण प्राध्यापक ए पी देसाई प्राध्यापक एस एम मोहोळकर राजेंद्र तांबिले तानाजी कांबळे डॉक्टर मनोज गुजर डॉक्टर केशव मोरे डॉक्टर ज्ञानदेव काळे इत्यादी उपस्थित होते.