दैनिक स्थैर्य । दि. ०६ जून २०२२ । फलटण । ६ शरयू ऍग्रो इंडस्ट्रीज लि., मोटेवाडी, कापशी, ता. फलटण संचलित अर्कशाळेला वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा राज्यपातळीवरिल कै रावसाहेब दादा पवार घोडगंगा सह साखर कारखान्याने पुरस्कृत केलेला सर्वोत्कृष्ट आसवनी पुरस्कार जाहीर झाला होता आज त्याचे वितरण खा श्री शरद पवार यांच्या शुभहस्ते व्ही एस आय ने आयोजित केलेल्या साखर परिषदे मध्ये समारंभपूर्वक करण्यात आले या वेळी सहकार मंत्री ना बाळासाहेब पाटील गृह मंत्री ना दिलीप वळसे पाटील राज्यमंत्री ना विश्वजीत कदम राज्य साखर संघांचे अध्यक्ष श्री जयप्रकाश दांडेगावकर साखर आयुक्त शेखर गायकवाड व्ही एस आय चे डायरेक्टर जनरल श्री शिवाजीराव देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.१ लाख रुपये रोख, सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे.
या पुरस्कारा बद्दल कारखान्याचे चेअरमन श्रीनिवास पवार,कार्यकारी संचालक युगेंद्र पवार तसेच संचालिका सौ शर्मिला पवार, संचालक श्री अमरसिंह पाटील यांचे विविध स्तरातील मान्यवारांनी अभिनंदन केले आहे.
सदरची अर्कशाळाला इन्सिंरेशन बॉयलर असून सांडपाणी प्रक्रियेसाठी स्वतंत्र जलशुद्धिकरण प्रकल्पाची उभारणी करण्यात आली असून त्यामध्ये अजून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून राज्यातील आधुनिक आदर्श हरित अशी अर्कशाळा करणार असल्याचे कार्यकारी संचालक श्री युगेंद्र पवार यांनी स्पष्ट केले आहे.
शरयु व्यवस्थापनातर्फे संचालक श्री अविनाश भापकर वरिष्ठ अधिकारी श्री ज्ञानेश्वर वाघमोडे श्री जयंत पाटील श्री महादेव भंडारे यांनी पुरस्कार स्वीकारला.