दैनिक स्थैर्य । दि. ३१ मे २०२२ । सातारा । अदालत वाडा परिसरातील शनिवार पेठेत खळग्या मारुती समोर असणाऱ्या देवधर वाड्याला मंगळवारी सकाळी साडेअकरा वाजता भीषण आग लागून या वाड्याचे मोठे नुकसान झाले .या आगीमध्ये इलेक्ट्रिक साहित्य तसेच संसार उपयोगी साहित्य पूर्णपणे जळून खाक झाले . सुदैवाने या आगीमध्ये जीवित हानी झाली नाही मात्र या वाड्यात राहणाऱ्या देवधर कुटुंबियांचे मात्र लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
आगीचे निश्चित कारण मात्र समजू शकले नाही तब्बल तीन तासानंतर ही आग आटोक्यात आणण्यास अग्निशमन दलाला यश मिळाले याबाबत अग्निशमन दलाच्या सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी 1106 शनिवार पेठ येथे खळगा मारुती मंदिरासमोर देवधर वाडा आहे हा वाडा सुमारे एकशे चाळीस वर्ष जुना असून येथे सुनिता बाळकृष्ण देवधर या वृध्दा येथे राहतात . या वाड्याला लागूनच देवधर यांच्या कुटुंबीयांचे इलेक्ट्रिक साहित्य दुरुस्ती करण्याचे दुकान आहे आज सकाळी साडेअकरा वाजता वाड्याच्या एका भागातून अचानकच मोठ्या प्रमाणात धूर येऊ लागल्याने नागरिकांची एकच पळापळ झाली वाड्याच्या ज्या भागात इलेक्ट्रिक साहित्य ठेवले होते तिथून आग पसरली असावी असा अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांचा अंदाज आहे मात्र ही आग मोठ्याने भडकल्याने आगीचे लोट दिसू लागले आगीचे वृत्त कळताच माजी नगरसेवक अमोल मोहिते आणि धनंजय जांभळे तसेच परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन आग विझविण्याचा प्रयत्न केला मात्र घराच्या तुळया कमानी या लाकडी असल्यामुळे आग पसरत गेली यामध्ये वाड्यातील देवधर कुटुंबियांचे संसार उपयोगी साहित्य टिव्ही फर्निचर कपाट दिवान तसेच दुकानातील इलेक्ट्रिक साहित्य टीव्ही मिक्सर असे आगीच्या भक्ष्यस्थानी पडून लाखो रुपयांचे नुकसान झाले.
आगीचे लोळ वाड्याच्या इतर भागात पसरताच येथील सुनीता बाळकृष्ण देवधर या एकमेव वृद्ध महिलेला तेथून तातडीने बाहेर काढण्यात आले या प्रचंड धुमसणाऱ्या आगीमध्ये वाड्याची एक बाजू पूर्णपणे काळी ठिक्कर पडली होती अग्निशमन दलाच्या वाहनाला तातडीने पाचारण करण्यात आले अग्निशमन दल आला की आग आटोक्यात आणण्यामध्ये तब्बल चार तास लागले मात्र कोणतेही साहित्य हाताला लागले नाही हा वाडा संपूर्णपणे लाकडी असल्याने तातडीने पसरली मात्र शनिवार पेठेचा हा भाग बराच या जुन्या वाड्यांचा असल्याने आग पसरण्याची भीती होती अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न करून ही आग आटोक्यात आणली . ही आग उन्हाच्या तडाख्यामुळे दिवसभर धुपत होती या आगीमुळे देवधर कुटुंबियांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.