विवाह सोहळ्यात चोरट्यानी मारला नववधूच्या दागिन्यावर डल्ला; पाच तोळ्याचा ऐवज लंपास

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ११ जून २०२२ । सातारा । विवाहविधी सुरू असतानाच अज्ञात चोरट्याने नववधूचे दागिने असलेल्या पर्सवर डल्ला मारण्याची घटना गुरुवारी काशीळ (ता.सातारा) येथील महामार्गालगत असलेल्या मंगल कार्यालयात घडली.अज्ञात चोरट्याने सुमारे ५ तोळ्यांचे २.११ लाख रुपये किंमतीचे नववधूचे सोन्याचे दागिने व अन्य साहित्य असलेली पर्स हातोहात लांबविली.या घटनेची फिर्याद अंजली जितेंद्र चेला (वय.६१,रा.हडपसर,पुणे) यांनी बोरगाव पोलीस ठाण्यात दिली आहे.

याबाबत बोरगाव पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे येथील अंजली चेला यांचा मुलगा निरंजन याचा विवाह कराड येथील आरती जाधव यांच्यासोबत होता.हा विवाहसोहळा काशीळ येथे महामार्गालगत असलेल्या एका मंगल कार्यालयात होता.प्रेमविवाह असल्याने हा विवाह सोहळा प्रथम हिंदू धर्माप्रमाणे व नंतर तेलगू रितिरिवाजाप्रमाणे पार पडणार होता.

दुपारी ३ च्या सुमारास हिंदू रितीप्रमाणे विवाहसोहळा पार पडल्यानंतर सायंकाळी ५ च्या सुमारास तेलगू पद्धतीने विवाह विधी सुरू असताना मुलाची आई अंजली चेला यांनी नववधूला मानाच्या पाच कांजीवरमच्या साड्या व त्यांच्या पर्समध्ये असलेला सोन्याचा हार काढून ब्राम्हणाकडे दिला.यावेळी अंजली चेला यांनी त्यांची पर्स जवळच्या खुर्चीवरच ठेवली होती.ब्राह्मणांकडे साहित्य दिल्यानंतर त्या लगेचच पर्स घेण्यासाठी वळल्या असता त्यांना खुर्चीवर पर्स आढळून आली नाही.काही क्षणातच अज्ञात चोरट्याने खुर्चीवरील पर्स हातोहात लांबविली.
घटनास्थळावरून अज्ञात चोरट्याने २.५ तोळे वजनाची सोन्याची चैन,२.२ तोळे वजनाचे सोन्याचे हातातील ब्रेसलेट,६ ग्राम वजनाचे सोन्याचे मणी व वाट्या,एक चांदीचा करंड,एक मोबाईल,विविध बैंकेचे डेबिट व क्रेडिट कार्ड,आधारकार्ड,पैनकार्ड, ड्रॅयव्हिंग लायसन्स असा सुमारे २.११ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला.या घटनेचा पुढील तपास हवालदार प्रवीण शिंदे करत आहेत.


Back to top button
Don`t copy text!