
दैनिक स्थैर्य । दि. ११ मार्च २०२२ । सातारा । सुनेला आत्महत्येस प्रवृत्त केले. या कारणावरून शाहूपुरी पोलीस ठाण्यात सासूवर गुन्हा दाखल झाला आहे. विद्या विजय भद्रे रा. समर्थ अपार्टमेंट, मंगळवार पेठ, सातारा असे गुन्हा दाखल झालेल्या सासूचे नाव आहे.
याबाबत कविता महेश लाड वय ४७, रा. मंगळवार पेठ, सातारा यांनी दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे की, मानसी विनायक भद्रे वय २४, रा. समर्थ अपार्टमेंट सातारा हिने तिची सासू विद्या भद्रे हिच्या जाचाला कंटाळूनच गळफास घेऊन आत्महत्या केली. मानसी हिच्या मृत्यूस ती सर्वस्वी जबाबदार आहे, असेही तक्रारीत म्हटले आहे. याबाबत अधिक तपास हवालदार वाघमारे हे करीत आहेत.