दैनिक स्थैर्य | दि. २७ फेब्रुवारी २०२४ | फलटण |
विडणी, ता. फलटण, जि. सातारा येथे सोमवारी ‘उसातील बिबट्या’ या विषयासंदर्भात जनजागृती कार्यक्रम वनविभाग, फलटण आणि ‘नेचर अँड वाईल्डलाईफ वेल्फेअर सोसायटी’, फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आला.
आज बिबट्या हा वन्यप्राणी जंगलातील राहिलेला नसून ऊस या पिकामध्ये राहणारा बनला आहे. त्यामुळे शेतकर्याला या वन्यजीवासोबत ‘एक शेजारी’ म्हणून जगणे हाच पर्याय आहे. ज्यातून आपण भविष्यातील मानव-वन्यजीव संघर्ष टाळू शकतो व समजात याविषयी एक आदर्श निर्माण करू शकतो.
या कार्यक्रमाला वनपरिक्षेत्र अधिकारी रगतवान सर, वनपरिमंडळ अधिकारी कुंभार सर व वनरक्षक लवांडे मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले.