दैनिक स्थैर्य । दि. ३१ मे २०२२ । सातारा ।राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या २९७ व्या जयंतीनिमित्त लोणंद येथील अहिल्यादेवी स्मारकास लोणंद तसेच पंचक्रोशीतील हजारोंच्या जनसमुदायाने भेट देत अभिवादन केले. याचबरोबर लोणंद नगरपंचायत येथेही मान्यवरांच्या उपस्थितीत अभिवादन करण्यात येऊन आले.
लोणंद येथील अहिल्यादेवी होळकर स्मारकास अभिवादन करण्यासाठी सकाळपासूनच मोठी गर्दी झाली होती. लोणंदच्या नगराध्यक्षा मधुमती पलंगे- गालिंदे , उपनगराध्यक्ष शिवाजीराव शेळके , सचिन शेळके , रविंद्र क्षीरसागर, सागर शेळके , भरत शेळके, रविंद्र शेळके, तृप्ती राहूल घाडगे, गणीभाई कच्छी, डाॅक्टर नितीन सावंत, डाॅक्टर अनिलराजे निंबाळकर, डाॅक्टर मकरंद डोंबाळे, दयानंद खरात, हणमंत शेळके, विनोद क्षिरसागर, डाॅ. नानासाहेब हाडंबर, डाॅक्टर दिलीप येळे, डाॅक्टर दिपक गोरड, डाॅक्टर सुजित धायगुडे, लक्ष्मण शेळके, सुभाषराव घाडगे, राजेश शिंदे, बबन शेळके, सुनिल शेळके, ॲड. गणेश शेळके, ॲड. गजेंद्र मुसळे, सागर गालिंदे, असगर इनामदार, रोहित निंबाळकर, हेमंत निंबाळकर, दादासाहेब इंदलकर, शंभूराज भोसले, चंद्रकांत शेळके, भावेश दोशी, डाॅक्टर अविनाश शेळके ,डाॅक्टर राहुल धायगुडे, डाॅक्टर सचिन धायगुडे, डाॅक्टर संदिप धायगुडे आदी मान्यवरांनी अभिवादन केले.
लोणंद येथील जेष्ठ नेते आनंदराव शेळके यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी ॲड. सर्फराज बागवान, नगरसेविका दिपालीताई संदिप शेळके, राजश्री रविंद्र शेळके , ज्योति डोणिकर, प्रविण व्हावळ, रमेश कर्णवर, राजेंद्र डोईफोडे, सुरेश शेळके, संदिप शेळके, दत्तात्रय खरात, उमेश खरात आदी मान्यवर उपस्थित होते.
लोणंद नगरपंचायत येथे आयोजित अहिल्यादेवी होळकर जयंती कार्यक्रात नगराध्यक्षा मधुमती पलंगे- गालिंदे ,प्रा. रघुनाथ शेळके, सुरेश शेळके यांची भाषणे झाली तर विनोद क्षीरसागर यांनी आभार व्यक्त केले.