लोणंदच्या भैरवनाथ डोंगरावर वृक्षारोपन करून साजरा करण्यात आला जागतीक पर्यावरण दिन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०६ जून २०२२ । लोणंद । जागतीक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून लोणंद येथील श्री भैरवनाथ डोंगरावर भैरवनाथ डोंगर ग्रुपच्या वतीने वड, आंबा, लिंब या झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.

लोणंद पासुन तीन किलोमिटर अंतरावर लोणंद – शिरवळ रोडवरील एमआयडीसी जवळ श्री भैरवनाथ डोंगर आहे. या
श्री भैरवनाथ डोंगरावर असणाऱ्या श्री काळभैरवनाथाचे मंदिर आहे. या डोंगरावर भैरवनाथ डोंगर मॉनिग वॉक ग्रुपच्या वतीने सुमारे शंभर झाडे गेल्या पाच वर्षात लाऊन कॅन, बाटली मध्ये पाणी नेऊन जगविली आहेत.गेल्या काही वर्षापासुन श्री भैरवनाथ डोंगरावर देवाला,व्यायाम, फिरायला, येणाऱ्या नागरीकांची वर्दळ वाढली. आहे.

भैरवनाथ डोंगरावर गेल्या पाच वर्षात खडकाळ डोंगरावर सुमारे शंभर पेक्षा जास्त वड, पिंपळ, लिंब, करंज,पिंपरण, चिंच, गुलमोहर, बुच, कॅशिया, बेल, आपटा, आदी प्रकारची झाडे लाऊन त्याचे एक ते दहा लिटर दररोज पाणी नेऊन यशस्वी संगोपन केले आहे.डोंगर ग्रुप गेली पाच वर्ष डोंगरावर झाडे लाऊन कॅन, बाटलीद्वारे दररोज पहाटे पाणी नेऊन झाडांचे संगोपन करीत आहे.

एक फुट उंचीची लावलेली झाडे आता सुमारे 7 ते 8 फुट उंच झाली आहेत. त्यामुळे या डोंगराचा माथा हिरवेगार होऊ लागला आहे.आगामी काळात डोंगरावर सुमारे दिड हजार फुट उंचीवर पाणी नेऊन मोठया प्रमाणावर वृक्षारोपन करण्याचा संकल्प डोंगर ग्रुपने केला आहे. त्यासाठी वन खाते व लोणंद नगरपंचायत यांचे सहकार्य लाभत आहे.

डोंगर ग्रुपने या खडकाळ व मुरमाड डोंगरावर कसलीच पाण्याची सोय नसताना झाडे लावण्याबरोबर ती जगविण्याचेही काम केले आहे.
जागतीक पर्यावरण दिन साजरा करताना यावेळी भैरवनाथ डोंगर ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष शशिकांत जाधव , मार्गदर्शक सदस्य संदीप शेळके – पाटील, हेमंत निंबाळकर, डॉ. अविनाश शेळके, सहदेव गोरड,शंभूराज भोसले, डॉ. मकरंद डोंबाळे, बबलू भाटिया, वरूण क्षीरसागर, पंकज क्षीरसागर,रविंद्र धायगुडे, बाळासाहेब कदम, सुरेश पवार, दादा हाके, डी डी घोलप , बिपीन शिंदे , भारत शेळके, हणमंत बोराटे, शरद नेवसे, धनंजय शेलार, अनिकेत धायगुडे, शामराव शेळके, इरफान मोकाशी,दादा शेळके, दादा इंदलकर, आण्णा शेळके, रोहीत क्षीरसागर, धनंजय शेळके, राजेंद्र धायगुडे, बाबु खमितकर , नाना दरेकर, इनुंस आगा , आनंदा पाडळे, विजय ढुमे, महेश यादव , कु. आयुष बबलू भाटिया, कु. आरव रोहीत क्षीरसागर आदी सदस्य उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!