लग्नाचे आमिष दाखवून युवतीवर बलात्कार


दैनिक स्थैर्य । दि. ३१ मे २०२२ । सातारा । लग्नाचे आमिष दाखवून 23 वर्षांच्या युवतीला धमकी देत कोल्हापूर, महाबळेश्वरला नेऊन बलात्कार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी एका युवकासह तिघांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

सैराज रफिक फरास (वय 25, रा. सातारा) असे गुन्हा दाखल झालेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पीडित युवती 23 वर्षांची असून, संशयिताने तिच्यावर लग्नाचे आमिष दाखवून महाबळेश्वर, कोल्हापूर आणि सातार्‍यात विविध ठिकाणी बलात्कार केला. याबाबत कोणाला सांगितल्यास, तुझ्या भावाला जिवंत मारण्याची व समाजात बदनामी करण्याची धमकी दिली. तसेच संशयित आरोपीची आई व भाऊ यांनीही संबंधित युवतीला हाताने लाथाबुक्क्याने मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. यावरून त्या दोघांवरही पोलिसांनी मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे.

संबंधित युवतीच्या पोटात दुखू लागल्यानंतर, तिला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी तिने पोलिसांना जबाब दिल्यानंतर ही घटना उघडकीस आली.


Back to top button
Don`t copy text!