रोजंदारी कामगारांच्या आत्महत्यांमध्ये माेठी वाढ; महाराष्ट्रात ५२७० जणांना संपवले जीवन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २४ एप्रिल २०२३ । नवी दिल्ली । रोजंदारी कामगारांच्या आत्महत्यांमध्ये ३६ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांत तामिळनाडू, महाराष्ट्र आघाडीवर आहेत.देशात २०२१ मध्ये ४१६७२ आत्महत्या झाल्या असून, त्यापैकी तामिळनाडूत ७६७३ व महाराष्ट्रात ५२७० आत्महत्या झाल्या. यातील अधिक चिंताजनक बाब म्हणजे तामिळनाडू व महाराष्ट्रात २०१७ ते २०२१ या पाच वर्षांच्या कालावधीत या आत्महत्यांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. २०१७मध्ये तामिळनाडूत ५६२४ व महाराष्ट्रात ३६६९ आत्महत्या झाल्या. आत्महत्या करणारांची संख्या वाढत राहिली आहे.

हाच कल भाजपशासित मध्य प्रदेश, गुजरातसह अनेक राज्यांत पाच वर्षे चिंतेचा राहिला. २०१७ मध्ये मध्य प्रदेशात ३०३९ व गुजरातेत २१३१ आत्महत्या झाल्या. २०२१ मध्ये मध्य प्रदेशात ४६५७ व गुजरातेत ३२०६ आत्महत्या झाल्या. दक्षिणेकडील आंध्र प्रदेश व तेलंगणा या दोन राज्यांमध्येही चित्र फारसे चांगले नव्हते. रोजंदारी कामगारांच्या २०२१ मध्ये आंध्रात ३०१४ तर तेलंगणात ४२२३ आत्महत्या झाल्या. प. बंगालमध्ये पाच वर्षांत रोजंदारी कामगारांच्या आत्महत्यांमध्ये घट झाली. राज्यात २०१७ मध्ये १४३८ तर २०२१ मध्ये ९२५ आत्महत्या झाल्या.

 नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखालील बिहारमध्ये २०२१ मध्ये २९ आत्महत्या झाल्या. माकपाशासित केरळमध्ये २०१७ मध्ये २६४३ आत्महत्या झाल्या होत्या. २०२१ मध्ये हीच संख्या २३१३ एवढी होती.

 रोजंदारी कामगारांच्या आत्महत्या देशात वर्षानुवर्षे वाढतच असल्यामुळे केंद्रीय गृहमंत्रालय चिंतेत आहे.

राज्ये २०१७ २०२१
तामिळनाडू ५६२४ ७६७३
महाराष्ट्र ३६६९ ५२७०
तेलंगणा २५०७ ४२२३
गुजरात २१३१ ३२०६
आंध्र प्रदेश १३९७ ३०१४


Back to top button
Don`t copy text!